आजी माजी सैनिक परिवाराच्या वतीने आमदार मोनिकाताई राजळे यांचा कासार पिंपळगाव येथे सन्मान सोहळा संपन्न 

सोळा आजी माजी सैनिक परिवाराच्या वतीने आमदार मोनिकाताई राजळे यांचा कासार पिंपळगाव येथे सन्मान सोहळा संपन्न

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अहमदनगर जिल्ह्यातील २२२ शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांची तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल कासार पिंपळगाव येथिल सार्थक मंगल कार्यालयात आजी माजी सैनिक परिवाराच्या वतीने भव्य दिव्य असा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला.कासार पिंपळगावातील सोळा आजी माजी सैनिकांच्या “शिवशक्ती सैनिक संघ “परिवाराच्या वतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅप्टन लक्ष्मणराव राजळे हे आवर्जून उपस्थित होते. यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते उपस्थित सैनिकांच्या पत्नींना साडीचोळी देउन हळदी कुंकवा सह तिळगुळ वाटप करण्यात आले. उपस्थित महिलांनीही एकमेकींना हळदी कुंकवाचा मान दिला.आमदार राजळे यांचा कासार पिंपळगावात प्रथमच सैनिकांच्या परिवाराच्या वतीने नागरी सत्कार करताना आमदार मोनिकाताई राजळे यांना गहिवरून आले होते.कारण गावातील सैनिकांनी देशाची सेवा करून आपल्या गावाची मान उंचावली होती.आणि गावातील आमदार व्हावा म्हणून राजळेंना निवडणुकीत पाठबळ दिले होते.सत्कारानंतर त्यांनी सर्व उपस्थित आजी माजी सैनिकांच्या कुटुंबाला आधार देत आस्थेने विचारपूस केली.कारण काही माजी सैनिक हे स्वर्गवासी झाले होते.त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेने चौकशी करीत धीर दिला.सत्काराला उत्तर देताना आमदार राजळे यांनी सांगितले की आजी माजी सैनिकांच्या शिवशक्ती सैनिक संघासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून पाथर्डी शहरात कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. शिवशक्ती सैनिक संघ परिवाराच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे सैनिकांच्या वतीने सांगण्यात आले. सैनिकांच्या वतीने आमदार राजळे सह उपस्थित सर्व सैनिकांच्या पत्नींना प्रिती भोजन देण्यात आले. कासार पिंपळगावचे सर्व माजी सैनिक मेजर चंद्रकांत कवळे, दादासाहेब शेळके,ज्ञानदेव जगताप, अशोक गायकवाड, नारायण भगत, विठ्ठल जगताप, मारुती दारकुंडे, भाऊसाहेब राजळे, विक्रम जगताप, संजय घोडके, बाळासाहेब राउत, मनिषा साळवे, दादासाहेब पवार, प्रकाश राजळे, नारायण राजळे, कर्नल लक्ष्मणराव राजळे. यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी देशसेवेत असलेले आणि सुटीवर गावाकडे आलेले ज्ञानेश्वर राजळे,शुभम राजळे हे ही आवर्जून उपस्थित होते.तसेच देशसेवेत असलेल्या सैनिकांच्या पाल्यांना ही आमंत्रित करण्यात आले होते.त्यांनाही सन्मानित करण्यात आले.त्यापैकी बाबासाहेब राजळे,राजेश राऊत,कडुबाई साळवे, विनायक म्हस्के, नाथा नाना उर्फ एकनाथ राजळे, विष्णू राउत, कांता राजळे, यांना ही सन्मानित करण्यात आले.आमदार राजळेंच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोतच असं आश्वासनही सैनिकांच्या वतीने ज्ञानदेव जगताप यांनी दिलं. आभार दादासाहेब शेळके यांनी मानले.