तिसगाव येथे कातखडे-भगत टावर्सचा आमदार राजळे,खासदार लंकेच्या हस्ते विविध सेवांचा शुभारंभ सोहळा संपन्न

तिसगाव येथे कातखडे-भगत टावर्सचा आमदार राजळे,खासदार लंकेच्या हस्ते विविध सेवांचा शुभारंभ सोहळा संपन्न

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”/स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे जेष्ठ उद्योजक शंकरराव बाबुराव कातखडे, मंगेश बाबासाहेब भगत, सोमनाथ कातखडे निर्मित कातखडे-भगत(के.बी.) टावर्सच्या विविध सेवांचा शुभारंभ सोहळा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार निलेशजी लंके,आणि शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे हे होते.राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले हे पाठीच्या मणक्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे प्रक्रुतीच्या कारणास्तव येऊ शकले नाहीत.प्रारंभी एकूण आकरा विविध सेवांच्या दालनात आमदार मोनिकाताई राजळे आणि खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला.प्रारंभी मंगेश भगत आणि ऋषिकेश दारकुंडे यांच्या “श्री सोमेश्वर मेडीकल”, नंतर सोमनाथ कातखडे यांच्या “सुप्रीया ॲटोमोबाईल्स”,नंतर कासार पिंपळगावचे रोहित मुरदारे यांचे “रॉयल सुपरमार्केट”, नंतर हनुमान टाकळीचे अमोल काजळे यांचे ठिबक व तुषार सिंचन निर्मित”पवनपुत्र ॲग्रो एजन्सी”,नंतर चेरमन शंकरराव कातखडे आणि व्हा चेरमन सुनिल परदेशी यांच्या “समता बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित तिसगाव”, नंतर डॉ.एम.ए.म्हस्के आणि डॉ.सौ.अनघा म्हस्के यांचे “साई क्लिनिक”, नंतर राजेंद्र पाठक आणि मंगेश भगत यांचे “शिवक्लिनिक लॅब”, नंतर मढीचे सचिन मरकड यांचे “आदेश सोलर सिस्टीम”, नंतर तिसगावचे मुस्ताक शेख फिटर यांचे “जनता गॅरेज”, नंतर प्रभाकर शिंदे फिटर यांचे “माउली ट्रॅक्टर गॅरेज”, आणि सचिन फिटर यांचे “साई ॲपे गॅरेज” इत्यादी आकरा दालनाच्या फिती कापून शुभारंभ करण्यात आला. नंतर झालेल्या जाहीर सभेत उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. आमदार खासदार यांनी सर्व उपस्थित व्यावसायिकांना संबोधित केले आणि सुबेच्छा दिल्या.नंतर मौलाना मन्सुर शेख,ढोलेश्वर संस्थानचे ह.भ.प.उद्धव महाराज ससे, भाऊसाहेब लोखंडे, पुरुषोत्तम आठरे, डॉ मिनिनाथ म्हस्के, व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेरमन उद्धवराव वाघ, मिर्झा मन्यार, सुनिल साखरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष शिवशंकर राजळे,ह.भ.प.भागवत महाराज उंबरेकर,ह.भ.प. भाउपाटील राजळे, महेश अंगरखे,रफिक शेख आणि पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांचा त्यांच्या माहेरातील गंगापूरच्या लगड परिवारातर्फे सन्मान करण्यात आला. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी पाथर्डी चे माजी नगराध्यक्ष अभयकाका आव्हाड, पाथर्डी बाजार समितीचे सभापती सुभाषराव बर्डे, माजी उपसभापती मुरलीधर भगत, संचालक अरुण रायकर, पवना डॅमचे सीओ अशोकराव शेटे, बाळासाहेब गारुडकर, दुध संघाचे संचालक बाळासाहेब लवांडे, माधवराव लोखंडे, नंदकुमार लोखंडे सर, डॉ बाळकृष्ण मरकड, डॉ.भा.ह.देशमुख, डॉ महेश बारगजे,डॉ निलेश म्हस्के, बाबासाहेब रांधवने, आदिनाथ नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेरमन बाबासाहेब बर्डे,कुशिनाथ बर्डे,शिवाजी भगत, भिमराव भगत, गणेश पालवे, दादासाहेब पाठक, दादा चितळे, मढी देवस्थानचे बबनतात्याउर्फ राधाकिसन मरकड, आष्टीचे नामदेव राऊत, सुभाष रासकर यांच्या सह पाथर्डी तालुक्यातील, अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि तिसगाव पंचक्रोशीतील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रिती भोजना नंतर या शुभारंभ सोहळ्याची सांगता झाली.या वास्तुतील दालनामुळे तिसगावच्या वैभवात निश्चितच भर पडेल आणि व्यवसाय भरभराटीला येईल असा विश्वास आमदार खासदार यांनी व्यक्त केला.