‘चोपडा महाविद्यालयात ‘साडी डे’ उत्साहात साजरा’
चोपडा – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश पाटील महाविद्यालयात दि. १३ जानेवारी २०२५ रोजी ‘साडी डे’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी शिक्षणमंत्री कै.अक्कासो.सौ. शरच्चंद्रिका सुरेश पाटील व संस्थापक अध्यक्ष कै.दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी हे उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. नरेंद्र शिरसाठ, उपप्राचार्य प्रा. डॉ. के.एन.सोनवणे उपप्राचार्य डॉ.ए.बी.सूर्यवंशी, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, महिला तक्रार निवारण समिती प्रमुख सौ.मायाताई शिंदे, डॉ.सौ.प्रीती रावतोळे, सौ.रजनी जैस्वाल आदि व्यासपीठावर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.मायाताई शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी डॉ.नरेंद्र शिरसाठ ‘आरोग्य शिक्षण व संस्कार’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘शिक्षण घेत असताना वेळेचा सदुपयोग करा. आरोग्याच्या बाबतीत नेहमी काळजी घ्या त्याचप्रमाणे स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी महिलांनी घराबाहेर पडलेच पाहिजे. स्वाभिमानी जीवन जगले पाहिजे’. याप्रसंगी अनेक क्षेत्रात नाव कमविणाऱ्या अनेक यशस्वी स्रियांची उदाहरणे दिली. या मनोगतनंतर विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी म्हणाले की, ‘महिलांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपले अस्तित्व निर्माण करायला हवे. जिद्द, मेहनत व चिकाटी तसेच धाडस यांच्या माध्यमातून यशाची अनेक शिखरे पार करण्याची धमक स्त्रियांमध्ये असते त्यासाठी स्वतःची क्षमता ओळखायला हवी’.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.अनिता सांगोरे व सौ. सुनीता पाटील यांनी केले तर आभार सौ.शुभांगी पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक बंधू- भगिनी यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी जीवन पाटील, विजय शुक्ल, कल्पेश पाटील यांनी परिश्रम घेतले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.