श्री.गो.से.हायस्कुलमध्ये कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती सप्ताहास प्रारंभ

श्री.गो.से.हायस्कुलमध्ये कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती सप्ताहास प्रारंभ

 

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित पाचोरा येथील श्री. गो.से.हायस्कुल या विद्यालयात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक यांच्या निर्देशानुसार कॉपीमुक्त अभियान अंतर्गत विद्यार्थी व पालकांसाठी जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

उपमुख्याध्यापक श्री.आर. एल.पाटील सर यांनी हा सप्ताह व त्याचे महत्व प्रस्ताविकात मांडले. मुख्याध्यापक श्री.एन.आर. पाटील सर या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक होते. विदयार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेची अनावश्यक भीती मनात बाळगू नये, तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी तसेच चांगला अभ्यास करून कॉपीमुक्त परीक्षा द्यावी या विषयी मार्गदर्शन केले.

या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांकडून 10 वी ची बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सामोरे जाण्यासाठी शपथ घेण्यात आली.श्री.डी.डी.कुमावत सर यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली.तसेच विद्यार्थ्यांसमोर शिक्षा सूचीचे वाचन श्री.बी. एस.पाटील सर यांनी केले.

सौ.एस.टी.पाटील मॅडम यांनी विदयार्थ्यांना परीक्षाकाळात घ्यावयाची आरोग्याची काळजी, आहार याविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एम. आर. पाटील सर यांनी केले.

कॉपीमुक्त अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांच्या जनजागृती रॅलीचे सुद्धा आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री. एन. आर. पाटील सर, उपमुख्याध्यापक श्री. आर. एल. पाटील सर, पर्यवेक्षक श्री.ए.बी.अहिरे सर , सांस्कृतिक प्रमुख श्री. एम. टी. कौंडिण्य सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते.