श्रीक्षेत्र हनुमान टाकळी कोपरे,व्रुद्धेश्वर साखर कारखाना,वडुले येथे संत वामनभाउ पुंण्यतीथी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

श्रीक्षेत्र हनुमान टाकळी कोपरे,व्रुद्धेश्वर साखर कारखाना,वडुले येथे संत वामनभाउ पुंण्यतीथी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी) संत भगवानबाबा आणि संत वामनभाउ पुंण्यतीथी सोहळा श्रीक्षेत्र हनुमान टाकळी, कोपरे व्रुद्धेश्वर साखर कारखाना,वडुले येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.हनुमान टाकळी येथे किर्तन महोत्सव सोहळ्यात सर्व ह.भ.प.शिवाजी फुंदे, आदिनाथ निकम, वैष्णवी बर्डे,अभिमन्यू भालसिंग, अनिल बर्डे, तुकाराम केसभट, ऋतुजाताई कासार, महेश आव्हाड,आणि शेवटी रविंद्र महाराज सुद्रिक यांच्या अमृततुल्य काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली.या सोहळ्यास संत जनाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ चंद्रकलाताई दगडखैर, ह.भ.प.शिवनाथ महाराज दगडखैर, संजय बर्डे,कुशिनाथ बर्डे, आदिनाथ दगडखैर,संजय डमाळ,अन्ना दगडखैर, शिवनाथ बर्डे हे आवर्जून उपस्थित होते.कोपरे येथे संत वामनभाउ पुंण्यतीथी निमित्ताने हा.भ.प.राजकुमार घुले यांचे जाहीर प्रवचन झाले.त्यांनी स्वरचित “राजयोगी महंत भगवानबाबा” या पुस्तकातील भगवानबाबा आणि संत वामनभाउ यांच्या चरित्राचा अभ्यास करून भाविकांना अध्यात्माचे धडे दिले. कोपरे येथील संत भगवानबाबा आणि संत वामनभाउच्या मंदिराच्या बांधकाम उभारणीसाठी जागेचे योगदान देणाऱ्या गंगा भागीरथी सितामाई धोंडिबा आव्हाड यांनीही अध्यात्मासाठी मोठे योगदान दिले आहे. दरवर्षी हा सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात माजी सरपंच रमेश आव्हाड, संजय आव्हाड,अर्जुन आंधळे, सुनिल आव्हाड, प्रल्हाद आव्हाड,भरत आव्हाड, नामदेव आव्हाड, रामकिसन आव्हाड, नितीन आव्हाड, अशोक आव्हाड, अंबादास आव्हाड हे आवर्जून उपस्थित होते. व्रुद्धेश्वर साखर कारखान्या जवळील शिरसाट वस्ती येथे ह.भ.प.शिलाताई महाराज मुंडवाडीकर आणि ह.भ.प.विजयाताई महाराज बनसोड यांची किर्तने झाली. ह.भ.प मच्छिंद्र महाराज चितळे, आणि ह.भ.प. केशव महाराज गुजर आव्हाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व ह.भ.प.अर्जुन चितळे,अक्षरादिदी मुरकुंडे, ममतादीदी जोशी, सुदर्शन महाराज, गायत्रीदीदी पैठणकर, पांडुरंग महाराज खरड,योगेश रणमले यांनी विशेष सहकार्य केले. बाबासाहेब शिरसाट, जनार्दन शिरसाट, सुखदेव शिरसाट, अशोक शिरसाट, सोमनाथ शिरसाट, गणेश शिरसाट, हे अनेक वर्षांपासून परंपरेने हा सोहळा साजरा करीत आहेत. अनेक भाविक भक्तांनी या सोहळ्याला हजेरी लावून महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.