महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची भडगाव येथे बैठक संपन्न
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची नुकतीच बैठक भडगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली यावेळी भडगाव तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली यात लोकमतचे भास्कर पाटील यांची तालुकाध्यक्षपदी तर रतिलाल पाटील यांची भडगाव तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली, संजय पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली, भडगाव शहराध्यक्षपदी सलाउद्दीन शेख यांना जबाबदारी सोपवण्यात आली आली, नवीन कार्यकारणीला पत्रकारांच्या हितसंबंधासाठी काम करण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली, ही निवड पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली , यावेळी विभागीय कार्याध्यक्ष अबरार मिर्झा, विभागीय उपाध्यक्ष भुवनेश दुसाने, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश रावळ, प्रल्हाद पवार मनिष सोनवणे, गोपाल भोई , मुजम्मिल शेख, चेतन महाजन, देवा महाजन, अलीम शहा, दिलीप पाटील ,जाकिर शेख, सह आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.