महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय सामनेर येथे माता पालक -शिक्षक सहविचार सभा संपन्न 

महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय सामनेर येथे माता पालक -शिक्षक सहविचार सभा संपन्न

 

18 जानेवारी रोजी 2025 रोजी महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय सामनेर येथे माता पालक -शिक्षक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आलेले होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय मुख्याध्यापक श्री.आर. आर भोसले सर होते. व्यासपीठावर स्थानिक स्कुल कमेटीचे सदस्य श्री.चंद्रकांत देवीदास पाटील श्री.एस.बी.पाटीलसर ,श्री.एस.एम.पाटील सर उपस्थित होते.माता प्रतिनिधी म्हणून लासगाव येथील सौ. कविता गणसिंग पाटील या होत्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये समन्वय असायला हवा असा मान्यवरांच्या चर्चेचा सूर होता .माननीय मुख्याध्यापक श्री आर आर भोसले सर यांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख वाचून दाखविला. गुणात्मक आणि दर्जेदार शिक्षण मिळणे हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा अधिकार आहे असे मुख्याध्यापकांनी सांगितले . शिक्षकांमधुन श्री.जी.एस.देशमुख सर, एस बी पाटील सर यांनी आपले विचार व्यक्त केले.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संगणक साक्षरता असणे आवश्यक आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना संगणका विषयी ज्ञान देणे अत्यंत आवश्यक आहे असे मुख्याध्यापकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी माता-पालकांनी काही सूचना मांडल्या त्या सुचना पूर्ण करण्याचे आश्वासन मा.मुख्याध्यापकांनी दिले. या सभेचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री वाय.के वंजारी सर यांनी केले. सभेत बहुसंख्या संख्येने माता-पालक उपस्थित होते. श्री ए.एन .चौधरी सर आभार प्रदर्शन केले अशाप्रकारे सहविचार सभा शांत व उत्साहात पार पडली.