पाचोरा येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजना महामेळावा संपन्न

पाचोरा येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजना महामेळावा संपन्न

 

 

(खंडपीठाचे न्यायमूर्ती व जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश , वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती)

 

(किशोर रायसाकडा) पाचोरा येथे राष्ट्रीय , राज्य , जिल्हा व तालुका विधी सेवा प्राधिकरण , वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पहिलेच भव्यदिव्य विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजना महामेळावा रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती , जिल्ह्यातील सर्व न्यायालयाचे न्यायाधीश व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम क्यू एस एम शेख महाशिबीराच्या अध्यक्षस्थानी होते.

निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाशिबीर झाले.याप्रसंगी औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अभय वाघवसे , महाराष्ट्र -गोवा बार कौन्सिलचे पालक सदस्य ॲड अमोल सावंत ,विधी सेवा समितीचे जिल्हा सचिव सलीम सय्यद , जिल्हाधिकारी डॉ आयुष प्रसाद , पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी ,न्या. जी बी औंधकर , न्या. एस व्ही निमसे, न्या. जी एस बोरा , जळगावच्या वकील संघाचे ॲड रमाकांत पाटील ,पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष ॲड प्रवीण पाटील , उपाध्यक्षा ॲड कविता रायसाकडा , प्रांत अधिकारी भूषण अहिरे , उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे , तहसीलदार विजय बनसोडे ,पोलीस निरीक्षक अशोक पवार , वैशाली सूर्यवंशी , नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांचेसहवकील बांधव व लाभार्थी उपस्थित होते.

उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाले.

याप्रसंगी ॲड प्रविण पाटील यांनी वकील संघाचे कार्य व न्यायालयीन उपक्रमांची माहिती दिली . सलीम सय्यद यांनी विधी सेवा समितीच्या वतीने करण्यात आलेल्या कार्याचा आढावा घेतला. पशु विभागाच्या वतीने लाभार्थ्यांना पशुधन भरपाईचे चेक देण्यात आले. विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश व शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात आली. महसूल विभागाच्या वतीने काही लाभार्थ्यांना घरकुलाची चावी व कागदपत्र देण्यात आली.

पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी जळगाव जिल्ह्यातील पोलीस विभागाची तर जिल्हाधिकारी डॉ आयुष प्रसाद यांनी महसूल विभागाच्या कामकाजाची माहिती दिली.

ॲड अमोल सावंत , न्या. एम क्यू एस एम शेख यांनी न्यायालयीन कामकाज , विधी सेवा समिती , पोलीस व महसूल विभागाचे कामकाज या संदर्भात माहिती दिली.

न्यायमूर्ती वाघवसे यांनी शासकीय योजना कागदावर न राहता त्या लाभार्थ्या पर्यंत पोहोचणे आवश्यक असते. तसे होत नसल्याने बरेचशे लाभार्थी योजनांपासून वंचित असल्याचे सांगून विधी सेवा समिती व शासकीय अधिकाऱ्यांच्या जबाबदारी संदर्भात मार्गदर्शन केले.

महाशिबीराच्या ठिकाणी विद्यार्थिनींचे लेझीम पथक व तुतारी वादकांनी मान्यवरांचे स्वागत केले. समई , नारळ व व झाडाचे रोप भेट देऊन सत्कार व औक्षण करण्यात आले.

महाशिबिराच्या ठिकाणी पोलीस , महसूल ,आरटीओ आरोग्य ,जिल्हा परिषद , पंचायत समिती , कृषी , महिला व बालकल्याण ,नगरपरिषद ,

बस स्टॅन्ड सह सर्वच शासकीय विभागांच्या वतीने स्टॉल लावून माहिती देण्यात आली.

शिबिराचे भव्यदिव्य व उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल न्या. जी बी औंधकर , ॲड प्रवीण पाटील , ॲड कविता रायसाकडा , निर्मल स्कूल वैशाली सूर्यवंशी , नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. महाशिबिरास विविध योजनांचे लाभार्थी , सर्व न्यायाधीश , वकिल, शासकीय अधिकारी , कर्मचारी , न्यायालयीन कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. गोविंद मोकाशी व सहकाऱ्यांनी स्वागत गीत गायीले. गो से हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले बेटी बचाव बेटी पढाव पथनाट्य उपस्थितांना भाऊक करणारे ठरले. प्रास्ताविक न्यायमूर्ती जी बी औंधकर यांनी केले. जळगावच्या न्या. मनीषा जसवंत यांनी उत्कृष्ठ सूत्रसंचलन केले. पाचोरा न्यायालयाचे सहन्यायाधीश एस व्ही निमसे यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने समारोप झाला.त्यानंतर न्यायाधीशांनी उपस्थित वकील बांधव, शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी यांच्याशी विविध योजना व विषयां संदर्भात चर्चा करून सुयोग्य कामकाजा संदर्भात मार्गदर्शन केले.