आष्टी तालुक्यातील दादेगावच्या भिल्ल समाजातील संजय उर्फ बुट्टया गायकवाडचा खुन कोणी केला? आमदार अमोल मिटकरी यांनी मिडिया समोर विचारलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मिडिया समोर आष्टी तालुक्यातील दादेगावच्या भिल्ल समाजातील बुट्टया गायकवाडचा खुन कोणी केला?यांची पुन्हा चौकशी करावी अशी मागणी केली होती.या विचारलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तर ऐका. वेळ दिनांक 25 एप्रिल 2014 रोजीच्या सकाळी साडेनऊ वाजता बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दादेगावच्या भिल्ल वस्तीवरील संजय उर्फ बुट्टया गायकवाड हा आपल्या घरी बसलेला असताना अचानक ईनोव्हा आणि सफारी गाडीतून सोळा सतरा लोक गावात दाखल झाले.त्यांनी गावातील एका व्यक्तीला संजय उर्फ बुट्टया गायकवाड हा कोठे भेटेल? असे विचारले असता त्यांनी भिल्ल समाजातील वस्तीकडे बोट दाखवत तो तेथेच राहतो आणि तेथेच शंभर टक्के भेटेल अशी खात्री दिली. तो पर्यंत बुट्याला ही खबर मिळाली होती तो सावधगिरीत असताना अचानकपणे गाडीतून उतरलेल्या लोकांनी हातात काठ्या,कुर्हाडी,कोयते,भाले, गावठी कट्टे घेऊन संजय उर्फ बुट्टया गायकवाड यांच्या वर हल्ला केला.मारेकरी चालून आलेले पाहताच तो गावाकडे पळून जाऊ लागला होता.त्यावेळी गाडीतून उतरलेल्या मारेकऱ्यांनी बुट्टयाचा सिनेस्टाईल ने पाठलाग करून रिव्हॉल्वर मधुन तिनं गोळ्या झाडल्या,दोन गोळ्या त्यांच्या पाठीत लागल्याने तो तेथेच खाली पडला.त्याच वेळी मारेकऱ्यांनी त्याच्यावर तलवारी, भाले, काठ्या कुर्हाडी कोयत्याने वार केल्यामुळे संजय उर्फ बुट्टया गायकवाड हा जागीच ठार होउन त्याचा म्रुत्यु झाला होता.संजय उर्फ बुट्टया गायकवाड यांच्या पत्नी रखमाबाई गायकवाड यांनी आष्टी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती.त्या फिर्यादी वरून आष्टी पोलिसांनी अमोल विधाते,भुजंग विधाते, शामराव विधाते, विकास बाजीराव आमटे यांना अटक केली होती.पुढे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी खोलात जाऊन चौकशी केली असता त्यांना या प्रकरणात आणखी काही आरोपी आहेत हे निष्पन्न झाले होते.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी राहुल उर्फ आबासाहेब विक्रम धस (वय28), सचिन उर्फ बाळू रोहिदास तांगडे (वय26), भाऊसाहेब धोंडिबा रणशिंग (वय55), या तिन आरोपींना अटक केली होती.ते तिन्ही आरोपी हे आष्टी तालुक्यातील जामगाव येथील रहिवासी होते. तर शेख अझर शेख एजाज (वय23),दिपक कचरू चव्हाण (वय27), हे राहणार आष्टी येथील रहिवासी होते.या पाचही आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना चांगलीच रानोमाळ भटकंती करावी लागली होती. या पाचही संशयित आरोपींना न्यायालयाने 12 मे 2014 पर्यंत पोलिस कोठडी दिली होती.त्यावेळी आष्टीचे आमदार सुरेश रामचंद्र धस यांच्या शेतातील वडिल,(रामचंद्र धस उर्फ दासादादा) यांच्या पुतळ्या जवळून पोलिसांनी शस्त्र जप्त केली होती.त्यावेळी भाजपचे केंद्रीय ग्रामविकास मंत्री नामदार गोपीनाथ मुंडे यांनी तातडीने बुट्टया गायकवाड यांच्या घरी भेट घेऊन गायकवाड कुटुंबाला दिलासा देउन सांत्वन केले होते.तसेच केंद्रीय समाजकल्याण मंत्री नामदार रामदास आठवले यांनी ही भेट घेऊन गायकवाड कुटुंबाला सरकारी मदत मिळवून देण्यासाठीचे आश्वासन दिले होते.सन 2014 साली झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते नामदार गोपिनाथ मुंडे साहेब यांनी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश रामचंद्र धस यांचा दणदणीत पराभव केला होता. तो पराभव भाजपच्या संजय उर्फ बुट्टया गायकवाड यांच्यामुळेच झाला होता म्हणून बुट्या गायकवाडला संपविण्यात आले होते अशी संपूर्ण आष्टी पाटोदा तालुक्यातील मतदारसंघात चर्चा झाली होती. त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नेते नामदार गोपिनाथ मुंडे यांना पत्रकारांनी असा प्रश्न विचारला होता की,”कशिकाय झाली बीड लोकसभेची निवडणूक”तर त्यांनी निवडणूकीत सिझर झालंय ,पण बाळ बाळांतीन सुखरूप आहेत”असे मिश्कीलपणे हसत खेळत उत्तर दिले होते. तेव्हा आता असा प्रश्न निर्माण होतो की कुठे तेव्हाचे नामदार गोपिनाथ मुंडे आणि कुठे आजची मंत्री पदासाठी लाचार झालेली भाजपाची पिलावळ ? राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मिडिया समोर संजय उर्फ बुट्टया गायकवाड यांच्या खुन प्रकरणाची पुन्हा फेर चौकशी करण्याची मागणी केली होती. आणि थेट आमदार सुरेश धस यांना इशारा देत “हमाम में सब नंगे होते है!” काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये असे सांगितले होते.आष्टी तालुक्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अजित पवार गटाचे नेते भाऊसाहेब लटपटे यांनी मिडिया समोर असा आरोप केला होता की संजय उर्फ बुट्टया गायकवाड यांच्या खुनामागे आमदार सुरेश धस आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी प्राजक्ता धस यांचा हात होता. त्यांनी त्या वेळेसचा घटना क्रम सांगताना संजय उर्फ बुट्टया गायकवाड हा हल्ला झाला त्यावेळी तिनं गोळ्या लागल्या नंतर तो जिवाच्या आकांताने ओरडत गावाकडे पळत सुटला होता.पाठीमागुन सिनेमातील सीन प्रमाणे दहा पंधरा जण हातात काठ्या, कुर्हाडी,तलवारी, कोयते, गावठी कट्टे घेऊन मयत बुट्टा उर्फ संजय गायकवाड यांच्या पाठीमागे पळत असताना संजय गायकवाड हा महादेव गितेच्या घरात लपला होता त्याला तिथुन बाहेर काढून जीवे मारले पण कोणीही मदतीला धावून आले नाहीत. या प्रकरणात मल्लिनाथ उर्फअप्पा सोनवणे याला लातूर मधुन पोलिसांनी अटक केली होती.पोष्टमार्टेम रिपोर्ट मध्ये म्रुत्युचे कारण ,”शस्त्राने हल्ला केल्याने मृत्यू” असे स्पष्ट शब्दात लिहिले होते. या हल्ल्यात शस्त्र बनवणारा लोहार हा एक महिनाभर आमदार सुरेश धस यांच्या घरी होता असाही आरोप करण्यात आला होता. आष्टीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनीही मिडिया समोर मुलाखत देताना असे सांगितले की 8 हिंदू आणि 2 मुस्लिम देवस्थानच्या जमिनी धसांनी लाटल्याचा आरोप केला आहे.आष्टीच्या पवनचक्क्या, कंपन्या, का बंद पडल्या.श्रीराम व शंभू महादेवाच्या जमिनी हडप केल्या. “मयत विक्रम धस ” यांच्या मर्डर केस मागे कोण आहे.1421 कोटी किमतीच्या 485 एकर जमिनी कोणी हडप केल्या.या प्रकरणात आड येणाऱ्या किती लोकांचे मुडदे कोणी पाडले?राम खाडे, सतिश शिंदे हे त्या वेळेस बळीचे बकरे ठरले आहेत.आदिवासी भिल्ल, पारधी समाजातील लोकांच्या जमिनी कोणी हडप केल्या.आष्टी पोलिस स्टेशनला भारतीय दंड विधान संहिता कलमे 420,467,468,506,448,147,148,471,504 ईत्यादी कलमांची नोंद धस यांच्या नावावर कशी काय आहे.आकरा कोटींची जंगम मालमत्ता,3कोटीची शेतजमीन,25 कोटीची स्थावर मालमत्ता,18 कोटीची बिगरशेती जमीन,24 लाखाचे सोने, 3 कोटीचे कर्ज अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी निवडणूक अर्ज दाखल करण्यात आला त्यावेळी निवडणूक आयोगाला दिली आहे.अशी माहिती आष्टीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनीही पत्रकारांना दिली आहे.आष्टी तालुक्यातील मयत बुट्टा उर्फ संजय गायकवाड यांच्या मृत्यू प्रकरणी तालुक्यातील नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ही केस पुन्हा एकदा न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात दाखल होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. काही नेत्यांनी बीड जिल्हा पोलिस अधीक्षक नवनित काॅवत यांची भेट घेऊन हे प्रकरण पुन्हा एकदा नव्याने ओपन करून गायकवाड कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी केली आहे.