आषाढी एकादशी निमित्ताने वेब मिडीया असोसिएशन पाचोरा’ची बैठक संपन्न
विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल चे संचालक डाॅ.भुषणदादा मगर व राष्ट्रवादी काँग्रेस’चे तालुकाध्यक्ष विकास पाटील सर यांची उपस्थिती व केली सकारात्मक चर्चा
वेब मिडीया असोसिएशन चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील व तालुका उपाध्यक्ष बंडु भाऊ सोनार यांचा वाढदिवस झाला साजरा !
तर देशदुत’चे व आरोग्यदुत न्युज’चे पत्रकार चिंतामण पाटील यांचा आज पाचोरा वेब मिडीया असोसिएशन मध्ये झाला प्रवेश !
पाचोरा प्रतिनिधी : आजचा काळात सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत आणि चालु-घडामोडी पाहण्याची सवय जवळपास सगळ्यांना झाल्याने वेब मिडीया व सोशल मिडीया नेटवर्क सर्वदुर पसरलेले आहेत.याच अनुषंगाने आता वेब मिडीया’साठी आजचा काळ प्रतिकुल व अनुकुल झाला आहे.
संघटीत राहुन काम करायची आवश्यकता असुन एकत्र येऊन लढण्याची गरज आहे.यासाठी विविध पैलुंवर चर्चा करण्यासाठी आजच्या बैठकीचे नियोजन वेब मिडीया असोसिएशन मुंबई चे विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल यांनी बैठक बोलावली होती.बैठकीत सर्वानुमते विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
आज वेब मिडीया असोसिएशन चे जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ पाटील व तालुका उपाध्यक्ष बंडु भाऊ सोनार यांचा वाढदिवस असल्याने सर्व वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी सोबत विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल चे संचालक डाॅ.भुषणदादा मगर व राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विकास पाटील सर यांच्या उपस्थितीत पाचोरा मंगलमुर्ती हाॅस्पिटल येथे उत्साहपुर्ण वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.
तसेच २५ वर्षापासुन ग्रामपंचायत सदस्य म्हणुन बिनविरोध निवड होत असलेले देशदुत व आरोग्यदुत न्युज’चे पत्रकार चिंतामण पाटील यांना वेब मिडीया असोसिएशन मध्ये प्रवेश घेऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी डाॅ.भुषणदादा मगर यांनी वेगवेगळ्या विषयांवर सकारात्मक चर्चा व मार्गदर्शन केले तर राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विकास पाटील सर यांनी वेब मिडीया असोसिएशन ची संकल्पना,धोरण आणि उद्दीष्टे माहिती जाणुन घेतली.तसेच सर्व वेब मिडीया पत्रकारांचे मतं व प्रतिक्रिया समजुन घेतले आणि त्या विषयांवर सकारात्मक चर्चा केली.
यावेळी वेब मिडीया असोसिएशन चे कार्यकारणी सदस्य योगेश पाटील सर,राजु भाऊ धनराळे , जिल्हा अध्यक्ष ईश्वरभाऊ चोरडिया, जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाऊ पाटील, जिल्हा सचिव नंदुभाऊ शेलकर,दिनेश भाऊ चौधरी जिल्हा सरचिटणीस गणेश शिंदे, जिल्हा संघटक एन एस भुरे, जिल्हा समन्वयक जावेद शेख, जिल्हा खजिनदार भुवनेश दुसाने,दिपक पवार,आतीषभाई चांगरे, तालुकाध्यक्ष निलेश पाटील, तालुका उपाध्यक्ष बंडु भाऊ सोनार,दिपकभाऊ गढरी , तालुका सचिव संजय पाटील,तालुका सरचिटणीस दिलीप परदेशी,तालुका समन्वयक प्रमोद बारी,दिलीप पाटील,फकीरचंद पाटील,सचिनभाऊ चौधरी, रविशंकर पांडे,चिंतामण पाटील हे उपस्थित होते.