चोपडा महाविद्यालयात ‘वार्षिक स्नेहसंमेलन’ व ‘पारितोषिक वितरण समारंभ’ उत्साहात संपन्न’
चोपडाः येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात आज दि.१६ जानेवारी २०२५ रोजी आयोजित ‘वार्षिक स्नेहसंमेलन’ तसेच ‘वार्षिक स्नेहसंमेलनाचा पारितोषिक वितरण समारंभ’ उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम.बागुल,
उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य डॉ. ए.बी.सूर्यवंशी, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.एस.पी.पाटील, पर्यवेक्षक श्री.ए.एन.बोरसे, कनिष्ठ विभागाचे समन्वयक श्री.पी.एस.पाडवी, रजिस्ट्रार श्री.डी. एम.पाटील आणि कनिष्ठ विभागाचे स्नेहसंमेलन प्रमुख श्री.एन.बी. शिरसाठ तसेच वरिष्ठ विभागाचे स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.पी.के.लभाणे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षक दिग्दर्शक मकरंद चौधरी व कलाकार राहुल निकुंभ यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एकलनृत्य, आदिवासी नृत्य, समूहनृत्य तसेच युवारंग स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या समूह वादन, समूह नृत्य व मूकनाट्याचे तसेच ‘मिठी निंद’ या नाटिकेचे सादरीकरण करून श्रोत्यांची वाहवा मिळविली. या कार्यक्रमाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनींसाठी आयोजित रांगोळी, मेहंदी, बुद्धिबळ, कॅरम, क्रिकेट, हॉलीबॉल, बेसबॉल, हॅन्डबॉल, एकलनृत्य, समूहनृत्य, एकांकिका, नाटिका, एकल गायन, समूह गायन, आनंद मेळावा, पाककला, संगीत शेला पागोटे व कागदी शेला पागोटे आदि स्पर्धांमध्ये विजेत्या प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनींना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जिमखाना विभागातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय व विद्यापीठ स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व ट्रॅकसूट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनातून आपले कलागुण प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध झाली त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी करून घेतला. नक्कीच आपल्या व्यक्तिमत्वात व आत्मविश्वासात यामुळे भर पडेल यात शंका नाही’.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सौ. क्रांती क्षीरसागर,सौ. कांचन पाटील व सौ. सुनीता पाटील यांनी केले तर आभार सौ.कांचन पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी तसेच वार्षिक स्नेहसंमेलन विविध समिती प्रमुख व सदस्य यांनी परिश्रम घेतले. या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.