विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत कलागुणांचा विकास करावा’ :- पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे

‘विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत कलागुणांचा विकास करावा’ :- पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात ‘वार्षिक स्नेहसंमेलन-२०२५’ प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा.अनिल भुसारे यांच्या हस्ते नटराज पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. आर. एम. बागुल, उपप्राचार्य डॉ.ए.बी.सूर्यवंशी, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख डॉ. सी. आर. देवरे, श्री. चेतन बाविस्कर, रजिस्ट्रार श्री.डी. एम. पाटील, सांस्कृतिक कार्यक्रम परीक्षक दिग्दर्शक मकरंद चौधरी व कलाकार राहुल निकुंभ आदी उपस्थित होते. यावेळी अनिल भुसारे सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटनपर मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. अंगभूत कला गुणांचा विकास करावा. समाज माध्यमांचा वापर काळजीपूर्वक करावा’.

यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात एकापेक्षा एक सरस नाटिका, पथनाट्य, एकल नृत्य, समूह नृत्य, आदिवासी नृत्य, कॉमेडी शो, सुगम गायन, समूह गायन, गीत गायन इत्यादी कार्यक्रमांचे विद्यार्थ्यांनी उत्साहात सादरीकरण केले. रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद दिला.

या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक कार्यक्रम समिती प्रमुख डॉ.सी.आर. देवरे तसेच डॉ.एस.बी.देवरे यांनी केले.