पाचोरा येथे तीन दिवसीय तालुकास्तरीय क्रीडाचे शुभारंभ

पाचोरा येथे तीन दिवसीय तालुकास्तरीय क्रीडाचे शुभारंभ

 

 

जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा पाचोराचे मैदानात तीन दिवसीय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा चे आयोजन गोराडखेडा उर्दू केंद्र

मार्फत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील पंचायत समिती पाचोरा यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. क्रीडा स्पर्धाची सुरुवातीला पुष्प देऊन गोराडखेडा उर्दू केंद्रप्रमुख शेख कदीर शब्बीर यांनी त्यांचे स्वागत केले. क्रीडा स्पर्धेत पाचोरा तालुक्यात येणारी सर्व जि.प. उर्दू शाळांनी व काही खाजगी शाळांनी सहभाग घेतला. चांगल्या रित्या क्रीडा स्पर्धाचे आयोजन केल्याने समाधान पाटील यांनी गोराडखेडा उर्दू केंद्राचे कौतुक केले. शारीरिक व मानसिक विकासासाठी असे प्रकारचे क्रीडा स्पर्धाची गरज एका निरोगी समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.केंद्रप्रमुख यांनीही दैनंदिन जीवनात व्यायाम व क्रीडा यांचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले. दरवर्षी इतर केंद्राचे तुलनेत येत्या काही वर्षात चांगल्या रित्या क्रीडा स्पर्धाचे आयोजन केल्याने समाधान पाटील यांनी उर्दू केंद्राचे कौतुक केले. क्रीडा मध्ये व्यक्तिक खेळ, जसे 100 मीटर रनिंग, स्लो सायकलिंग, लिंबू चमचा, थैला रेस, म्युजिक चेअर, लंगडी दौड, तसेच सामूहिक खेळ खो-खो, डॉच बॉल, ग्रुप लंगडी च्या आयोजन करण्यात आलेला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख जावेद रहीम यांनी केले. यावेळी क्रीडा मध्ये सहभाग घेणारे तालुक्यातील विद्यार्थी मोठी संख्यात उपस्थित होते. मंचावर ग्रेडेड मुख्याध्यापक अब्दुल एजाज रऊफ, अश्फाक शेख,इस्माईल सुलेमान, रईस सुबहान खान, क्रीडा शिक्षक अजहजर शेख, सलाउद्दीन शेख,सलमान शौकत, सुफियान रंगरेज,वसीम खाटीक, अब्दुल खालिक काकर,मोईन सय्यद, रिजवान शेख, सईद शब्बीर, बाबा खान, अजहर शेख,आदी मान्यवर उपस्थित होते.