युवा सप्ताहानिमित्त खो खो स्पर्धा संपन्न

युवा सप्ताहानिमित्त खो खो स्पर्धा संपन्न….!!!!

 

जळगाव – क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य ,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जळगांव व जळगांव जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवा सप्ताह प्रित्यर्थ 17 वर्षा खालील खो खो स्पर्धा आज दि. 15 – 1 – 2025 रोजी जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या मैदानावर संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त श्री. गणपतराव पोळ सर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र खो खो असोसिएशन चे सहसचिव श्री जयांशू पोळ सर , डॉ.सुरेश थरकुडे सर, राज्य खो खो मार्गदर्शक श्री मीनल थोरात सर , जळगांव जिल्हा खो खो असोसिएशन चे सचिव श्री राहुल पोळ सर राज्यस्तरीय खो खो पंच श्री दत्तात्रय महाजन हे उपस्थित होते या स्पर्धेत विविध शाळांनी सहभाग नोंदवला होता.

स्पर्धेला सदिच्छा भेट जळगांव जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रविंद्र नाईक साहेब व तालुका क्रीडा अधिकारी श्री जगदीश चौधरी सर यांनी देऊन अंतिम सामन्याचे नाणेफेक करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

पंच म्हणून गोपाळ पवार,हर्षल बेडीसकर, छगन मुखडे,केतन चौधरी,मोहित गुंजकर, प्रथमेश कंखरे, महेश मोरे यांनी काम पाहिले.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

 

मुलं

 

🥇 अनुभुती इंग्लिश मेडियम स्कुल , जळगांव

 

🥈आर.आर.विद्यालय, जळगांव

 

🥉एस. आर.सी.हायस्कूल, किनोद

मुली

 

🥇आर.आर.विद्यालय, जळगांव

 

🥈 श्री. गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनी, जळगांव

 

🥉अनुभुती इंग्लिश मेडियम स्कुल , जळगांव