श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 16 व 17 जानेवारी 2025 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन
पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा यथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पाचोरा येथे दिनांक 16 व 17 जानेवारी 2025 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालय शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन मा.दादासाहेब प्रा.सुभाष तोतला सर असणार आहे व कार्यक्रमाचे उद्घाटन मा.अशोक पवार साहेब पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पाचोरा प्रमुख उपस्थिती म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे संचालक मा.दादासाहेब खलील देशमुख, मा.भाईसो दुष्यंत रावल व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पाटील उपस्थित राहणार आहे.उद्घाटन समारंभा नंतर विद्यार्थ्यांच्या विविध कला गुण दर्शनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:00 सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ असणार आहे तसेच पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते व सुप्रसिद्ध गझलकार मा.डॉ सदाशिव सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय नानासाहेब संजयजी वाघ व मानद सचिव मा. अँडव्होकेट दादासाहेब महेश देशमुख संस्थेचे व्हाईसचेरमन मा.नानासाहेब व्ही.टी जोशी व ज्येष्ठ संचालक दादासाहेब सुभाष तोतला तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित राहणार आहे.