आमदार मिटकरींनी उल्लेख केलेल्या पाथर्डीतील कोठेवाडी दरोडा घटनेला चोवीस वर्षे पूर्ण! जुन्या आठवणींना उजाळा ?

आमदार मिटकरींनी उल्लेख केलेल्या पाथर्डीतील कोठेवाडी दरोडा घटनेला चोवीस वर्षे पूर्ण! जुन्या आठवणींना उजाळा ?

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा ) “उषःकाल होता होता काळरात्र झाली,अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली “‌ या कवितेच्या ओळीची आठवण कोठेवाडी दरोडा खटल्याच्या निमित्ताने येते.संपूर्ण राज्यभर गाजलेल्या कोठेवाडी दरोडा घटनेला आज १७ जानेवारी २०२५ ला बरोब्बर चोवीस वर्षे पूर्ण होत आहेत.त्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देउन नवीन पिढीला माहिती व्हावी म्हणून हा लेख लिहिण्याचा सारा खटाटोप! राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल विटकरी यांनी मिडिया समोर आष्टीतील आमदारावर ज्या पाथर्डीतील कोठेवाडी दरोडा खटल्याच्या अनुषंगाने आरोप केले. तो खटला नेमका काय होता त्या घटनेला आज चोवीस वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने हा उजाळा देत आहे. दि.१७ जानेवारी २००१ या दिवशी मध्यरात्री ३.३० मिनिटानी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी येथील वस्तीवर दहा ते पंधरा आरोपींनी दरोडा टाकून जबरदस्त मारहाण करून चार महिलावर सामुहिक बलात्कार केला होता.व वस्तीवरील लोकांचे ४४ हजार ३५ रुपये किंमतीचे दागिने चोरले होते. तेरा आरोपिंना बारा वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयाने सुनावली होती.या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम साहेब यांनी काम पाहिले होते.या दरोड्यातील आरोपींनी त्या काळात वैजापूर,गंगापूर या भागात ही असेच सामुहिक बलात्कार, मारहाण करून दरोडे टाकले होते ते न्यायालयात सिद्ध झाले होते.अहमदनगर येथील मोक्का न्यायालयाचे विषेश न्यायाधीश एस एस गोसावी यांनी गुरुवार दिनांक २२ डिसेंबर २०१६ या दिवशी १३ आरोपींना बारा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती.आणि दंड न भरल्यास पुन्हा आणखी दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा दिली होती. एकुण एक कोटी तिस लाखांच्या दंडाची शिक्षा या आरोपींना देण्यात आली होती.या निकालाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपिलीय याचिका दाखल केली होती.या अपिलावरही अहमदनगर येथील मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची सुनावलेली शिक्षा औरंगाबाद खंडपीठात कायम करण्यात आली होती. सुरुवातीला हा दरोडा पैशांसाठी टाकलाय असे वाटत असतानाच पत्रकारांनी खोलात जाऊन चौकशी केली असता खरी वस्तुस्थिती समोर आली. तो अत्यंत थंड डोक्याने विचार करून शिजवलेला कट च होता हे लक्षात येते.त्यावेळी शिवसेनेच्या नेत्या निल्लम गोर्हे यांनी विधानसभेत आवाज उठवून या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना चांगलेच कामाला लावले होते.त्या गुन्ह्यात जे आरोपी सहभागी झाले होते त्यांच्या अंगातील बनियन वर “सुरेश धस मित्रमंडळ” असे नाव छापलेले होते. यातील काही आरोपी जेव्हा शिक्षा भोगून जेव्हा ३ ऑगस्ट २०२१ मध्ये बाहेर आले त्यावेळी आताचे आष्टीचे आमदार सुरेश धस हे कारागृहाबाहेर आरोपीच्या स्वागतासाठी हजर होते.हेच विषेश आहे. कोठेवाडी प्रकरणात माफीचा साक्षीदार बनलेल्या एका आरोपीने पोलिसांना सर्व माहिती सांगितली होती.दरोडा हे निमित्त होते पण सामुहिक बलात्कार हाच पुर्व नियोजित कट होता.या कारणाने भारतीय दंड विधान संहिता(१२० ब) या कलमाखाली न्यायालयाने सन २०१० मध्ये बारा आरोपींना दोषी ठरवले होते. कोठे वाडीतल्या ऊसतोड कामगारांच्या छोट्याशा गावात वाड्या वस्त्या वर राहणाऱ्या अबलावर या टोळीतील नराधमांनी अतिशय थंड डोक्याने अत्याचार केले होते.सन २००१ सालातील या घटनेमुळे कष्टकरी महिलांवरील अत्याचाराला “कोठेवाडी”हा प्रतीशब्द तयार झाला होता.या गुन्ह्यात एकुण पंधरा आरोपी होते परंतु एक जण हा अल्पवयीन असल्याने या प्रकरणातुन त्याला वगळण्यात आले होते. या गुन्ह्यातील आरोपी मध्ये १) दारासिंग उर्फ मारुती वकिल्या भोसले (वय२८) राहणार पाण्याचे धामणगाव ता.आष्टी, जिल्हा बीड,२) रमेश उर्फ रेच्या धुपाजी काळे (वय३२), राहणार ब्राह्मणगाव ता.आष्टी जिल्हा बीड,३)बंडू उर्फ बबन उत्तम भोसले (वय३०) राहणार,वाळुंज ता.नगर,४)हबिब उर्फ हब्या पानमळ्या भोसले (वय३०), राहणार साबलखेड ता.आष्टी जिल्हा बीड,५)गारमन्या खुबजत चव्हाण (वय३७) राहणार शेरी ता.आष्टी जिल्हा बीड,६)राजू उर्फ अंदाज वकिल्या भोसले (वय२५), राहणार धामणगाव पाण्याचे ता.आष्टी जिल्हा बीड,७)उमऱ्या घनश्या भोसले (वय३७) राहणार चिखली ता.आष्टी जिल्हा बीड,८)रसाळ्या डिंग्या भोसले (वय३०) राहणार चिखली ता.आष्टी, जिल्हा बीड,९) संतोष उर्फ हरी डिस्चार्ज काळे (वय२१) राहणार हिवरे पिंपरखेड ता.आष्टी जिल्हा बीड,१०) सुरेश उर्फ तिर्थ्या चिंतामणी (वय२१) राहणार शेरी ता. आष्टी, जिल्हा बीड,११)हनुमंता नकाशा भोसले (वय२५), हिवरे पिंपरखेड ता.आष्टी, जिल्हा बीड,१२)चिकु उर्फ चिक्या सरमाळ्या भोसले(वय३५) राहणार वाळुंज ता.आष्टी, जिल्हा बीड,१३) सुभाष काशिनाथ देसाई (वय३०) राहणार साबलखेड ता.आष्टी जिल्हा बीड या तेरा आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.साक्षी आणि पुराव्यावरून कोर्टाने मोक्का कायद्याच्या कलम ३(१),(२) अन्वये तेरा आरोपिंना बारा वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.चौदावा आरोपी करंड्या उर्फ गुड्या डिस्चार्ज काळे (वय३०) राहणार चिखली हा कोर्टातुन पळून गेला होता.३ऑगष्ट २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी न्यायालयात संघटीत गुन्हेगारी सिद्ध होउ शकली नाही म्हणून आरोपींची सुटका केली होती .राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मिडिया समोर आष्टीतील आमदारावर आरोपीशी संबंध असल्याचे आरोप केले होते त्यामुळे या कोठेवाडी दरोडा घटनेला उजाळा मिळाला. या निमित्ताने कवींच्या चारोळ्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.” कोठेवाडीत उषःकाल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली”.१७ जानेवारीला चोवीस वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने या घटनेला उजाळा मिळाला. या घटनेतील एक आरोपी कैदी क्रमांक सी.६५४४ हब्या पानमळ्या भोसले (म्रुत्यु समयीचे वय ५५)हा औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत असताना म्रुत्यु पावला होता.