सत्ताधाऱ्याच्या विरोधात न्याय व विकासासाठी बंड करणारे व्यक्तिमत्व –आनंद जिवणे उर्फ पृथ्वीराज पाटील 

सत्ताधाऱ्याच्या विरोधात न्याय व विकासासाठी बंड करणारे व्यक्तिमत्व –आनंद जिवणे उर्फ पृथ्वीराज पाटील

 

 

 

————————

*देवणी* : शहर व तालुक्याच्या व जिल्ह्याच्या व मराठवाड्याच्या शैक्षणिक सामाजिक राजकीय शेतकरी शेतमजूर यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणून सत्ताधाऱ्याच्या विरोध संघर्ष करणार एकमेव लढवय्या नेतृत्व म्हणजे आनंद जीवने उर्फ पृथ्वीराज पाटील हे होय

आनंद जिवणे यांचा जन्म सर्वसामान्य शेतकरी कुटूंबात देवणी येथे झाला आहे आनंद जिवने यांना कसलाही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या मेहनती वरती शिवा संघटनेचे सेवक म्हणून अनेक दिवस कार्य केले व राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा प्रमुख म्हणून अनेक दिवस कार्य केले व सरपंच सेवा संघटनाचे ते मराठवाडा अध्यक्ष म्हणून अनेक सरपंचाना न्याय मिळवण्यासाठी काम केले व ते बसव टीव्ही मराठी चॅनलचे महाराष्ट्र सल्लागार समिती सदस्य म्हणून काम करत आहेत व तसेच लोक लढा सहसंपादक म्हणून काम करत आहेत व सध्या शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष म्हणून काम करत आहेत जीवनामध्ये असे अनेक पदे व अनेक पक्षाच्या अनेक आमदार खासदार मंत्री असे अनेक राजकीय लोकांच्या संपर्कात राहून वैयक्तिक संबंध बनवून घेऊन असे अनेक उपक्रम व जनतेच्या हिताचे कार्य परत आपल्या जीवनाचा संघर्ष जीवनाचा प्रवास करून सर्वसाधारण जनतेच्या अन्यायाच्या विरोधात अत्याचाराच्या विरोधात लढण्याची वृत्ती मागून मिळत नसेल तर हिसकावून घेतलं पाहिजे त्यासाठी करावा लागणारा संघर्ष याची तयारी ठेऊन सर्वसामान्य माणसाच्या सुख दुःखात खंबीर पाठीशी उभे राहून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सातत्याने शासन दरबारी मांडणारा युवकांचा *छावा म्हणजे आनंद*

आनंद जिवने तालुक्यातील असं एकमेव नेतृत्व आहे त्यांनी देवणी तालुक्याच्या विकासा संदर्भात शासन दरबारी अनेक प्रश्न सातत्याने मांडले आहेत त्यात देवणी वळू संशोधन केंद्र .देवणी चा कायम पाणी पुरवठा प्रश्न , शेतकरी विमा, एम. आय. डी. सी. देवणी शहरातील विकास कामा संदर्भात आवाज उठवण्याचे काम त्यांनी केले आहे त्यांचा पाठपुरावा करून अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आनंद जिवने यांनी केला आहे सत्ता कोणाची असो देवणी तालुक्याचा विकास झाला पाहिजे देवणी तालुक्याचा बॅक लॉक भरून निघाला पाहिजे यासाठी जीवाचे रान करून हजारो निवेदना द्वारे देवणी तालुक्याचे हजारो प्रश्न शासनाच्या वेशीवर टांगण्याचे काम आनंद जिवने यांनी केले आहे देवणीच्या विकासासाठी उघड्या डोळ्यांनी पाहणारा त्यासाठी प्रयत्न करणारा आपल्या कार्यातून दुसऱ्याला आनंद देणारा एकमेव आनंद जीवने विकासाची असणारा दुसऱ्याच्या जीवनात आनंद फुलवणारा कोणी निंदो कोणी वंदो याकडे लक्ष न देता सातत्याने सामाजिक बांधिलकी जोपासून काम करणारे आनंद जिवने यांच्या जीवनात असाच आनंद बहरू दे त्यांच्या हातून असेच सदकर्म घडू दे एवढीच त्यांच्या कार्यास सदिच्छा….!

गिरीधर गायकवाड