कला छंद आर्ट ड्रॉइंग क्लासेस ची विद्यार्थिनी वैष्णवी पाटील हीचे सर्वप्रथम पारितोषिक प्राप्त पोस्ट ऑफिस विषयावरील चित्र थेट मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे प्रदर्शित होणार

अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

 

कला छंद आर्ट ड्रॉइंग क्लासेस ची विद्यार्थिनी वैष्णवी पांडुरंग पाटील हीचे सर्वप्रथम पारितोषिक प्राप्त पोस्ट ऑफिस विषयावरील चित्र थेट मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे प्रदर्शित होणार

 

भारतीय पोस्ट ऑफिस तर्फे 2047 मधील पोस्ट ऑफिस या विषयावर राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत आपल्या कला छंद आर्ट ड्रॉइंग क्लास ची विद्यार्थिनी वैष्णवी पांडूरंग पाटील इयत्ता 7 वी हिस जळगाव डिविजन मधून सर्वप्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच तिचे चित्र आता पुढील स्तरावर मुंबई येथे पाठविले असून संपूर्ण महाराष्ट्रातून विविध डिविजन मधून बक्षीस प्राप्त चित्रांचे विशेष प्रदर्शन – महापेक्स 2025 शीर्षकाखाली मुंबई येथील सुप्रसिध्द वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे दिनांक 22 ते 25 जानेवारी या कालावधीत भरवण्यात येणार आहे.

वैष्णवी हिस बक्षीस देण्यासाठी जळगाव पोस्टल डिविजन चे प्रमुख एस एस म्हस्के सर , तसेच चाळीसगाव सब डिविजन चे उप प्रमुख एम डी चव्हाण सर यांची विशेष उपस्थिती लाभली.तसेच त्यासोबत पाचोरा पोस्ट ऑफिस येथील अनंत पाटील , गौरव निकम आदी उपस्थित होते. वैष्णवी हिस कला छंद आर्ट ड्रॉइंग क्लासेस चे कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी (सर जे जे स्कूल ऑफ आर्ट,मुंबई) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कला छंद आर्ट ड्रॉइंग क्लासेस चे अनेक विद्यार्थी आता विविध स्पर्धांमधून चमकत असून भविष्यात अनेक राज्य आणि राष्ट्रीय पारितोषिक आमचे विद्यार्थी नक्की मिळवत राहतील , असा विश्वास यावेळी कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

 

संपूर्ण कला छंद आर्ट ड्रॉइंग क्लास परिवारातर्फे वैष्णवी चे मनःपूर्वक अभिनंदन तसेच पुढील उज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा

 

🔵 शैलेश कुलकर्णी 🔵

कला छंद आर्ट ड्रॉइंग क्लास पाचोरा

8446932849