कुरंगी येथे निराधार आश्रमाचे भूमिपूजन
नांद्रा (ता.पाचोरा ) ता.20 कुरंगी ता.पाचोरा आज निराधार आश्रमाचे भूमिपूजन करण्यात आले . धर्मराज जनसेवा बहुउद्देशीय फाऊंडेशनच्यावतीने निराधार आश्रमाचे नियोजन करण्यात आले आहे .यासाठी संस्थेचे अध्यक्ष व माध्यमिक व उच्चमाध्यमिक कन्या विद्यालय पाचोरा चे प्राचार्य संजय पवार यांनी संस्थेला एक एकर जमीन दान केली . धर्मराज जनसेवा फाऊंडेशनच्यावतीने निराधार आश्रम फक्त एक सुरुवात आहे यानंतर लवकरच विभिन्न ठिकाणी निराधार आश्वासनांचे नियोजन करण्यात येईल असे संस्थेचे सचिव शिवराणा व्याख्याते डॉ संतोष पाटील गोराडखेडेकर यांनी बोलून दाखविले . याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक रामचंद्र पवार , शालिनी पवार , रंभाआई पवार , डॉ सूर्यकांत पवार व सौ अनिता पवार , देविदास पाटील , विलास बारेला , लोकेश पवार , रतीलाल बारेला , अनिल पाटील , डॉ दीपककुमार पवार , दिनेश बारेला यांची उपस्थिती होती.याप्रसंगी सूत्रसंचालन डॉ नीलेश पवार यांनी केले तर आभार सौरभ पवार यांनी मानले. फोटो …कुरंगी (ता.पाचोरा )येथील निराधार आश्रमाच्या कामाचे भूमिपूजन करतांना संस्थेचे अध्यक्ष संजय पवार ,सचिव शिवव्याख्याते डाँ.संतोष पाटील (गोराडखेडा),जेष्ठ नागरिक रामचंद्र पवार ,डाँ.सूर्यकांत पवार आदी.