कासार पिंपळगाव जिल्हा परिषद शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे फोडणाऱ्या समाज कंटकावर कारवाईची मागणी 

कासार पिंपळगाव जिल्हा परिषद शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे फोडणाऱ्या समाज कंटकावर कारवाईची मागणी

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिका राजळे यांच्या कासार पिंपळगावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. गावातील काही समाज कंटकांनी सदर सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले आहेत.या शाळेच्या गेटवरील आवारात गावातील काही विशिष्ट समाजाचे समाज कंटक दररोज रात्री उशिरापर्यंत मटका ,दारू, गांजा, पिऊन धिंगाणा घालत आहेत.परिसरातील वातावरण दुषित करीत आहेत.या शाळेतील सामानाच्या अनेक वेळा शाळेच्या दरवाज्याचे कुलुप तोडून चोऱ्या झालेल्या आहेत.चोर कोण आहेत हे ग्रामसेवकांना आणि गावातील ग्रामस्थांना माहिती आहेत.संबंधित गुन्हेगारांच्या पालकांना अनेक वेळा समज देऊनही काहीच फरक पडत नाही.सर्व ग्रामस्थ सांगतात की या वळु प्रमाणे असणाऱ्या समाजकंटक मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? शालेय ग्राम शिक्षण समितीने याबाबत कठोर कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.परंतू मतांच्या लाचारीसाठी कोणालाही दुखवण्याचा प्रयत्न केला जात नाही.अवैध उद्योग धंद्याचे हे परिणाम संपूर्ण गावालाच भोगावे लागत आहेत. शाळेच्या गेटवर या परिसरात तंबाखू, गुटखा,दारू,सिगारेट, पिण्यास सक्त मनाई आहे हे गैरकृत्य करणाऱ्यांना दोनशे रुपये दंड करण्यात येईल असा बोर्ड लावलेला असताना शाळेच्या मुख्याध्यापकांनी कोणत्याही समाजकंटकावर कारवाई केल्याचे दिसून येत नाही. अंगणवाडीचे कुलुप तोडून अनेक वेळा शालेय पोशन आहाराची चोरी झालेली आहे. परंतु तक्रार करण्यास कोणीही शालेय कर्मचारी धावत नाही ही खरी शोकांतिका आहे. शाळा बंद असताना गावातील प्रतिष्ठित म्हणून घेणाऱ्यांची मुलं शाळेच्या गेटवरून उड्या मारून आत प्रवेश करून नेमकं काय करतात हा एक फार मोठा संशोधनाचा विषय आहे. शाळेच्या आवारातील गेटसमोर एक मंदिर आहे या परीसरात ही या समाज कंटकांनी कंपाऊंडच्या आत मुताऱ्या केल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.लघवी करणाऱ्यांवर ही कडक कारवाई करावी.गेटवरून उड्या टाकून आत जाताना एकाला रंगेहाथ पकडले होते त्यावेळी तो म्हणाला तुझी शाळा आहे का? अशा प्रकारे गैरकृत्य करणाऱ्यांना गावातील लोक पाठीशी घालत असतील तर गावातील शाळेच्या शिक्षकांनी नेमकं काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे.आमदार राजळे यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून पाथर्डीच्या पोलिसांना सांगून अवैध उद्योग धंद्याचा पर्दाफाश करावा अशी मागणी गावातील ग्रामस्थांची मागणी आहे. गावातील शालेय शिक्षण समितीने याबाबत कठोर कारवाई करण्याचे पाऊल उचलावेत आणि अशा या समाजकंटकाना चांगला धडा शिकवला तरच या गैरप्रकारांना आळा बसेल असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावातील अनेक घरांमध्ये कुत्री, मांजर पाळले जातात आणि त्यांच्या पिलांना पिशवीत घालून या परिसरात आणून सोडतात आणि मुक्या जिवांचा तळतळाट घेतात ही एक फार मोठी नविन कहाणी गावात निर्माण झाली आहे. कुंपणानेच शेत खाल्ले तर न्याय मागायचा कुणाला? याचा गावातील पुढारपण करणाऱ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. या प्रकरणात तातडीने गावातील समाजकंटकांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या तर निश्चितपणे या गोष्टीला आळा बसेल.पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून ते फोडणाऱ्या समाज कंटकांची धरपकड करून कारवाई केली तरच या गैरप्रकारांना चाप लागून जरब बसेल.