पाचोऱ्यात मराठा सेवा संघ तर्फे राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जयंती निमित्त प्रतिमा पूजन 

पाचोऱ्यात मराठा सेवा संघ तर्फे राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जयंती निमित्त प्रतिमा पूजन

 

 

पाचोऱ्यात राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जयंती निमित्त पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिजाऊ प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष एस के पाटील तालुकाध्यक्ष सुनील पाटील संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष जिभाऊ पाटील मार्केट कमिटी सभापती गणेश पाटील मार्केट कमिटी माजी सदस्य दत्ताभाऊ बोरसे नगरसेवक विकास पाटील सर डॉक्टर नरेश गवांदे डॉक्टर स्वप्नील पाटील एडवोकेट प्रवीण पाटील अखिल मराठा समाजसेवा प्रतिष्ठानचे सचिव संजय पाटील मराठा सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष मुख्याध्यापक एन आर ठाकरे सर माजी तालुकाध्यक्ष दीपक पाटील डॉक्टर गोरख महाजन,संभाजी ब्रिगेड माजी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील ,माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, दिपक मुळे, किशोर डोंगरे , किसन सूर्यवंशी सर ,अशोक निंबाळकर ,संदिप महालपुरे,विजय जाधव भूषण चौधरी , पिरन पाटील उपस्थित होते. जय जिजाऊ जय शिवराय च्या जयघोषात जिजाऊपुजन करण्यात आले

व जिजाऊ वंदना एस्.ए.पाटील सर यांनी सादर केली. याप्रसंगी खान्देशरत्न डॉ.स्वप्निल पाटील, सभापती गणेश पाटील व वकिल संघाचे नुतन अध्यक्ष एडव्होकेट प्रविण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस्.ए.पाटील सर यांनी केले.