पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये “रेझिंग डे ” पोलिस स्थापना सप्ताह साजरा, शालेय विद्यार्थ्यांना दिली पोलिस स्टेशनमधिल सर्व कामकाजासह हत्यारांची माहिती
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये “रेझिंग डे” सप्ताह साजरा करण्यात आला.पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये या पोलिस स्थापना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. श्री तीलोक जैन विद्यालयातील इंग्लिश मिडीयमचे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षक यांना पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी तांबे साहेब यांनी विद्यार्थ्यांना पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांच्या दैनंदिन कामकाजा बाबद सखोल माहिती दिली.पोलिस स्टेशनमध्ये आल्यावर तक्रारदाराची तक्रार कशी घ्यायची,पोलिस स्टेशनमध्ये आणल्यावर आरोपींची कशी देखभाल केली जाते. त्यांना पकडून चोवीस तासात न्यायालयात कसे हजर केले जाते.नंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस कोठडी सुनावण्यात आल्यावर त्याला ठेवण्यात आलेल्या पोलिस कोठडीची इत्यंभूत संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.तसेच पोलिस स्टेशनमध्ये वापरण्यात येणाऱ्या हत्यारांची माहिती,पोलिस बंदोबस्ताचे नियोजन कसे केले जाते या बद्दल ही माहिती देण्यात आली.आता शासनाच्या नवीन आदेशानुसार पोलिस डायरीतील भारतीय दंड विधान संहिता कलमा ऐवजी आता “भारतीय न्याय संहिता कलमे” असा नविन कलमामधे रूपांतर होऊन कसा बदल झाला त्या बदललेल्या कलमांची ही माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या मनातील पोलिसां विषयी असलेली भितीची भावना दुर केली.तुम्ही विद्यार्थीच आता देशाचे खरे आधार स्तंभ आहात त्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी व सुधारण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले. या प्रसंगी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले ए.एस.आय. राजेंद्र म्हस्के, गुप्त वार्ता विभागाचे नव्याने बदलून आलेले नागेश वाघ, पोलिस अधिकारी अल्ताफ शेख, नानासाहेब केकाण, लक्ष्मण पोटे, विनोद मासाळकर हे पोलिस अधिकारी उपस्थित होते.