राज्य बालनाट्य स्पर्धेत गो. से. हायस्कूलने उमटवला ठसा

राज्य बालनाट्य स्पर्धेत गो. से. हायस्कूलने उमटवला ठसा

 

पाचोरा – विविध प्रसार माध्यमांच्या अतिरेकी उपयोगातून जातीजातीत वाटला जाणारा समाज आणि त्याचा विद्यार्थी मनावर निर्माण होणारा पगडा दाखविणारे महेश कौंडिण्य लिखीत दिग्दर्शित बालनाट्य ‘कास्टलेस इंडिया’ श्री गो.से.हायस्कूलने यांनी सादर करत ठसा उमटवला.

शासनाच्या महाराष्ट्र सांस्कृतीक संचालनालयातर्फे आयोजीत केलेल्या या राज्य बालनाट्य स्पर्धेत तालुक्यातून पहिल्यांदाच सहभागी होण्याचा मान श्री. गो.से. हायस्कूल या विद्यालयाने मिळवला.

विद्यार्थ्यांच्या मनात महापुरुषांच्या केवळ एका समाजासाठी संकुचित विचाराने निर्माण होणाऱ्या प्रतिमा उंचावून जातीयतेच्या पलिकडे या राष्ट्रपुरुषांचे कार्य बालप्रेक्षकांना कळावे. विद्यार्थ्यांच्या मनात जातीयतेचे सामाजिक चित्र नष्ट होवून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे मनोरंजनातून उद्‌बोधन करणाऱ्या या बालनाट्यात ललित आंबेकर, गीत महाजन, आयुष निकम, सार्थक चिंचोले, धवल सूर्यवंशी, आर्यन तडवी, कार्तिकी पाटील, दिव्यराज खैरनार, स्तवन भट, नेहा महालपुरे, देवश्री कासार, चेतन सोनवणे, भुवन्य सूर्यवंशी, यज्ञेश चौधरी, देवांश महाजन, सृष्टी वाघ, सृष्टी शिंपी, सायली सोनार, नेहा महालपुरे या बालकलावंतांनी अभिनय केला. तांत्रिक बाजू सुबोध कांतायन यांनी रंगभूषा, रविंद्र जाधव यांनी प्रकाश योजना, सोनाली सूर्यवंशी वेशभूषा, स्मिता सोनवणे पार्श्वसंगीत या तंत्रज्ञांनी सांभाळल्या. शाळेने उत्कृष्टपणे केलेल्या या सादरीकरणाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव ॲड.महेश देशमुख,व्हाईस चेअरमन व्ही.टी.जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, मुख्याध्यापक एन. आर .पाटील उपमुख्याध्यापक आर.एल. पाटील तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.अंजली गोहिल,पर्यवेक्षक ए.बी.अहिरे, आर.बी.तडवी, तांत्रिक विभाग प्रमुख एस .एन.पाटील किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर यांनी संघाचे अभिनंदन व कौतुक केले.