कै.रघुनाथराव जगताप फाउंडेशन संचलित ग्लोबल नर्सिंग स्कूल ए एन एम/जी एन एम पाचोरा ह्या संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा
कृष्णापुरी पाचोरा येथील ग्लोबल नर्सिंग स्कूल.ए एन एम/जी एन एम ह्या संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम दिनांक2812/2024 रोजी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमा सोबतच पारंपरिक लोककला,नाट्य,नृत्य,तसेच समाज प्रबोधन पर अनेक कार्यक्रम उत्साहात सादर केले.
महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण विभाग मुंबई,मान्यता प्राप्त
तसेच महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परवैद्यक शिक्षण मंडळ मुंबई .संलग्न असलेली ग्लोबल नर्सिंग स्कूल ही संस्था बारावी पास मुला मुलींना नर्सिंग अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारे
ए एन एम तसेच जी एन एम कोर्स चालवते.
सदर कॉलेज मध्ये पाचोरा तालुका तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे.
कॉलेज चे पहिलेच वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहामध्ये साजरे झाले असून स्नेह संमेलनाचे अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य मा. मधुकर काटे , प्रमुख अतिथी म्हणून पाचोरा येथील श्रेयेश हॉस्पिटल चे प्रसिद्ध डॉक्टर जयंत पाटील, शिवसेनेचे रवींद्र पाटील, कडे वडगाव चे ग्राम पंचायत सदस्य भगवान पाटील, सतिष पाटील , शोभा अक्का पाटील, वरसाडा
ग्राम पंचायत सदस्य राठोड,माजी नगर सेवक आर के पाटील , मोमीन तडवी,संदीप कंडारे , डॉ.शीतल होले,मयनाज तडवी,आबा पाटील ,समाधान पाटील, गणेश पाटील निलेश पाटील,पप्पू वाणी,पवन जगताप, अमोल आघम, विद्यार्थि,पालक तसेच कृष्णापुरी येथील महिला,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष माननीय अरुण पाटील,मधुभाऊ काटे, डॉ.जयंत पाटील,रवींद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.व आपले विचार व्यक्त केले.
संस्थेचे कोषाध्यक्ष हृषिकेश पाटील. यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलेज मधील विद्यार्थी,विद्यार्थि व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.