जय भगवान महासंघाच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी केशवराव चेमटे यांची निवड
(सुनिल नजन चिफब्युरो अहिल्यानगर जिल्हा) जय भगवान महासंघाच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी केशवराव चेमटे यांची निवड करण्यात आली आहे.जय भगवान महासंघाच्या शेवगाव तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांची बैठक भगवान महासंघाचे संस्थापक आणि राज्य संपर्क प्रमुख बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण रोडवरील हाॅटेल साईपुजा येथे मावळत्या वर्षाला निरोप देत नुकतीच पार पडली. या बैठकीस अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष रमेश सानप, जिल्हा उपाध्यक्ष संदीप फुंदे, जिल्हा सरचिटणीस नितीन आव्हाड, उदयभाउ मुंडे,अजय केदार, अंकुश दराडे, आणि शेवगाव तालुक्याचे युवा नेते पप्पू केदार हे आवर्जून उपस्थित होते. या बैठकीत जयभगवान महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख बाळासाहेब सानप यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांना नवीन निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.या वेळी पुढीलप्रमाणे शेवगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शेवगाव तालुका अध्यक्षपदी केशवराव चेमटे, उपाध्यक्ष पदी महादेव लक्ष्मण जवरे, कार्याध्यक्ष पदी भिमराव विष्णू बटुळे, , तालुका शहर अध्यक्ष पदी योगेश हंगे यांची तर शेवगाव तालुका युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी ऋषिकेश बंडूपंत वनवे यांची निवड करण्यात आली.तालुका युवा शहर अध्यक्ष पदी शुभम बडे, तालुका युवा उपाध्यक्ष पदी गोरक्ष ढाकणे, तालुका युवा सरचिटणीस अशोक केदार तर शहर युवा उपाध्यक्ष पदी सुरज डमाळे यांची निवड करण्यात आली. या सर्व निवडीचे पत्र प्रदान करण्यात आल्या नंतर प्रमुख नेते बाळासाहेब सानप म्हणाले की राज्यातील मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे आम्ही त्यांचा आदर करतो. परंतु ज्या ज्या ठिकाणी समाजावर अंन्याय होईल तेथे आपण ताकदीने उभे राहिले पाहिजे.मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे त्यांच्या हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शिक्षा करण्यासाठी जी मदत लागेल ती करण्यास आम्ही तयार आहोत परंतु या प्रकरणामुळे सर्व वंजारी समाजाला बदनाम करण्याचे काम जे काही ठराविक लोकांनी चालवलेले आहे ते बरोबर नाही. काही पुढारी तर नुसते राजिनामेच मागत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात शिवरायांच्या काळात सर्व अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन महाराजांनी आपल्या राज्याची धुरा सांभाळली आणि आजचे काही पुढारी वंजारी समाजाला टार्गेट करीत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी ही आम्ही कटिबद्ध आहोत असा इशाराही बाळासाहेब सानप यांनी दिला आहे. सर्वच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सानप यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस हार्दिक दिल्या आहेत. आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी बीड येथे सर्व जयभगवान महासंघाच्या वतीने भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी हॉटेल साईपुजा येथे बाळासाहेब सानप यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचें जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. शेवगाव तालुक्यतील अनेक मान्यवर मंडळी याप्रसंगी उपस्थित होती.आभार युवा नेते पप्पू केदार यांनी मानले.