मुलीने दिले रिटायर्डमेन्ट च्या दिवशी दिली पित्याला अनोखी भेट

मुलीने दिले रिटायर्डमेन्ट च्या दिवशी दिली पित्याला अनोखी भेट

प्रसंग होता वडिलांच्या सेवानिवृत्तीचा….!

 

 

 

वडील म्हणजेच *सहाय्यक फौजदार (ASI ) श्री देवेंद्र मोतीराम दातीर* हे 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या या सोहळ्यात त्यांचे सिनियर अधिकारी,DYSP, धनंजय येरुळे पाचोरा उपविभाग, पोलिस निरिक्षक- अशोक पवार पाचोरा पो.स्टे., पोलिस निरिक्षक-,मुरलीधर कासार जामनेर पो.स्टे.,पो. निरिक्षक- सचिन सानप पहूर पो. स्टे.,नातेवाईक, स्नेही, यांनी सर्वांनी त्यांना भेटवस्तू, शुभेच्छा दिल्यात. सौ.र. ना देशमुख वरिष्ठ महा. भडगावचे .प्राचार्य श्री एन. एन . गायकवाड सर यांनी व इतर मान्यवरांनी त्यांच्याबद्दल खूपच सुंदर विचारही मांडले परंतु त्यात एक वेगळी चित्रमय भेट होती ती त्यांच्या मुलीची कु. वैष्णवी देवेंद्र दातीर हिची. लेक म्हणजे संपूर्ण कुटुंबाची शान असते आणि पित्याचा अभिमान असते या वरून हे दिसून येते.

वैष्णवी ही *रंगश्री आर्ट फाऊंडेशन* ची कलेच्या क्षेत्रातील विद्यार्थिनी आहे.तिने आपल्या वडिलांना श्री देवेंद्र दातीर यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी त्यांचे व्यक्तीचित्र त्यांना सप्रेम भेट दिले. चित्र पाहून श्री. व सौ. दातीर मॅडम यांना गहिवरून आले. त्यांना नकळत तिने हे चित्र फक्त 9ते 10 तासामध्ये हुबेहूब तयार केले. वर्दी ची असलेली खाकी शेड,कॅप, चेहऱ्यावरील पोलीसी बाणा बारीक निरीक्षणातून चित्र निर्मिती केली आहे. मुलीकडून पित्याला मिळालेली ही अनोखी भेट होती. वैष्णवीने आता पर्यंत बरीच चित्र केलीत.पेन्सिल शेडींग, कलरपेन्सिल, जलरंग, ओपेक कलर अश्या विविध माध्यमातून साकारली आहेत . त्यात गणेशा राधाकृष्ण,तुळजाभवानी पुष्पा इ.

चित्रे साकारतांना तिला सुबोध कांतायन सर यांचे मार्गदर्शन लाभते.

तिचे सर्वत्र परिसरात कौतुक होत आहे.