पाचोरा येथील सुप्रसिध्द रांगोळीकार कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी यांचे रांगोळी प्रात्यक्षिक

पाचोरा येथील सुप्रसिध्द रांगोळीकार कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी यांचे रांगोळी प्रात्यक्षिक

 

पाचोरा येथील कलाशिक्षक सुप्रसिध्द रांगोळीकार शैलेश कुलकर्णी यांनी नुकतेच राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय कुरहे पनाचे तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथे विद्यार्थ्यांना रांगोळी प्रात्यक्षिक दाखवले. सुमारे ९०० ते १००० विद्यार्थ्यांनी या 3 डी रांगोळी प्रात्यक्षिक चा आनंद घेतला. शैलेश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना कलेचे महत्व समजावून सांगताना रांगोळी कलेप्रकाराबद्दल संपूर्ण माहिती दिली. शाळेचे वार्षिक शालेय संमेलनात शैलेश कुलकर्णी यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. संपूर्ण विद्यार्थी व उपस्थित शिक्षक या अनोख्या कलाप्रकाराने भारावून गेले. कार्यक्रम प्रसंगी शाळेचे कलाशिक्षक संजय चव्हाण सर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच शाळेचे मुख्यध्यापक , चेअरमन , तसेच संपूर्ण शिक्षक वृंद उपस्थित होते. सर्वांनीच या अनोख्या कलेला दाद दिली.