कोणी माईका लाल आला तरी या संस्थेला हात लावू शकत नाही, “कुशल दादा” मी असताना तुम्हाला आता चिंता करायची गरज नाही : आमदार प्रसाद लाड

कोणी माईका लाल आला तरी या संस्थेला हात लावू शकत नाही, “कुशल दादा” मी असताना तुम्हाला आता चिंता करायची गरज नाही : आमदार प्रसाद लाड

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” अहिल्यानगर जिल्हा) ‌ मी आता पुन्हा आलोय ,जरी कोणी माईका लाल आला तरी आता या संस्थेला हात लावू शकत नाही.कित्येक लोकांनी ही संस्था गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला पण मी कुशल दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहीलो आहे.मी आता पुन्हा आलोय तो हुतात्मा बाबू गेणू समाजवादी विद्यापीठ संचलित माजी आमदार कै. बाबुराव भापसे विद्यालय आणि महाविद्यालय ही शैक्षणिक संस्था मोठी करायची या उद्देशाने आलोय.या संस्थेचे आताच ज्युनिअर कॉलेज सुरू झाले आहे.या वर्षभरात लॉ कॉलेज, नर्सिंग कॉलेज, पॅरामेडिकल कॉलेज, सुरू करायचं आहे.येणाऱ्या पाच वर्षांत आपल्याला चांगला विकास करायचा आहे. कुशल दादा तुम्हाला आता चिंता करायची गरजच नाही असे उदगार भाजपचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार प्रसादजी लाड साहेब यांनी काढले. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील निंबोडी फाटा येथील भापसे महाविद्यालयात कै.माजी आमदार बाबुराव भापसे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त शालेय विद्यार्थ्यांना वार्षिक बक्षीस वितरण समारंभात अध्यक्ष पदावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तिसगावचे जेष्ठ नेते आणि पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे, डॉ.काशिनाथ ससाणे,चिचोंडीचे सरपंच श्रीकांत आटकर,पाडळीचे सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब कचरे, पाथर्डी बाजार समितीचे संचालक शेषराव पाटील कचरे, मुख्याध्यापिका संगिता भापसे,आमदार सौभाग्यवती निता लाड , पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी भंवर साहेब हे आवर्जून उपस्थित होते. आमदार लाड साहेब पुढे म्हणाले की आता आपलं सरकार आलंय या संस्थेचा पुर्णपणे कायापालट करण्यासाठी मी ईथे आलो आहे.या संस्थेच्या फक्त सहा शाळा आणि एक कॉलेज आहे.त्याचा झपाट्याने विस्तार करायचा आहे.मंत्री बनन्यापेक्षा मंत्री बनवनारा मोठा असतो.राजकारणात पद येतात आणि जातात पण मंत्रालयातील कामं महत्वाची असतात.स्वतःच्या ईच्छा शक्तीवर समाजापुढे जाऊन जीद्दीने यशस्वी होण्याची जिद्द असली पाहिजे. प्रवरेला, शिर्डीला पाणी येत मग ते पाथर्डीला का येत नाही असा सवाल ही त्यांनी उपस्थित करीत स्वपक्षातील मंत्री विखेपाटील यांना चिमटा काढला.”आणि आता मला आमदार झाल्या सारखं वाटतंय” अशी मिश्किली केली. पुढच्या जिवनात ज्यांच्या कडे पैसा असेल तोच राजकारण करू शकतो असेही त्यांनी सांगितले.उच्च शिक्षित लोक राजकारणात असले पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या विषयी बोलताना अनाथांचा नाथ एकनाथ,आणि देवाभाउ आपल्या बरोबर आहेत हे सांगताना त्यांनी सांगितले की कोणालाही दुर्गम आजार झाला तर माझ्याशी किंवा कुशल दादाशी संपर्क साधा.आम्ही मुंबईत डायलासेस, हार्ट सर्जरी, कॅन्सर, या सारख्या आजारावर दरवर्षी सुमारे दोनशे विनामूल्य ऑपरेशन करून गोरं गरीबांची सेवा करतो.चालता फिरता दवाखाना असे अनेक वैद्यकीय उपक्रम चालवतो. शुंन्य पैशात ऑपरेशन करण्याची व्यवस्था करतो. पुण्या मुंबईत ही काही वैद्यकीय व्यवस्था लागली तर मुख्यमंत्री देवा भाऊंनी विना पैशात ऑपरेशन करण्याची व्यवस्था केली आहे.अंत्योदय प्रतिष्ठानच्या मार्फत गोरगरिबांच्या आरोग्याचे काम केले जाते.तुमचा जावई म्हणून अर्ध्या रात्री केव्हाही हाक मारा तुमच्यासाठी जावई म्हणून उभा राहण्याच काम मी करीन अशी ग्वाही आमदार प्रसादजी लाड साहेब यांनी दिली.त्यांच्या हस्ते ट्राॅफी देउन गुणवंत शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.आणि एका संस्थेने या शाळेला तिनं लॅपटॉप बक्षीस म्हणून दिली.आर्थिक परीस्थितीमुळे शिक्षण घेउ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे दायित्व आपण घेऊ असे आश्वासन आमदार महोदयांनी दिले. या वेळी आमदार प्रसादजी लाड साहेब यांचा तिसगाव ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने भव्य दिव्य असा सपत्निक नागरी सत्कार करण्यात आला.प्रारंभी दीप प्रज्वलन आणि माजी आमदार स्व.बाबुराव भापसे आणि स्व.प्रमोद भापसे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रास्ताविकात संस्थेचे पदाधिकारी कुशल दादा भापसे यांनी सांगितले की आम्ही गोरगरिबांच्या 125 विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचं पालन,पोशन,आणि शिक्षण संस्थेद्वारे करीत आहोत.लाडक्या बहिणींचे ही काम करतो.सहा ही शाळेत खेळाच्या स्पर्धा घेतो. या कार्यक्रमासाठी पिंटूशेठ परमार, सुनिल शिंगवी, कुंडलीक मचेसर, विनायक कचरे सर,शिरापूरचे माजी सरपंच अर्जुन बुधवंत,किरण गर्जे, राजेंद्र लवांडे, नारायण कराळे, अजित देवढे, कुणाल भापसे, सचिन बर्डे, भाऊसाहेब शेलार, बिस्मिल्ला पठाण, यांच्या सह सहाच्या सहाही शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार नंदकुमार लोखंडे सर यांनी मानले.सर्व शालेय विद्यार्थ्यांना प्रितीभोजन देउन या पुण्यस्मरण सोहळ्याची सांगता झाली.