पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री.गो.से. हायस्कुलचा प्रथम क्रमांक
पाचोरा पंचायत समिती, शिक्षण विभाग आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन नांद्रा येथील आप्पासाहेब पी.एस.पाटील माध्यमिक विद्यालयात 24 डिसेंबर रोजी संपन्न झाले.
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से.हायस्कुलचा 10 वी चा विद्यार्थी स्वयंम राजेंद्र सोनवणे याने बनविलेल्या
Ionic Plasma Thruster या उपकरणाची पाचोरा तालुक्यातून माध्यमिक गटात प्रथम क्रमांकाने निवड झाली. त्याला शाळेतील सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.भाऊसो.श्री. दिलीप वाघ, चेअरमन मा.नानासो.श्री.संजय वाघ, व्हाईस चेअरमन मा.नानासो. श्री.व्ही.टी. जोशी, मानद सचिव मा.दादासो.ऍड.श्री.महेश देशमुख, शालेय समिती चेअरमन मा.दादासो.श्री. खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन मा. आण्णासो.श्री.वासुदेव महाजन, संस्थेचे संचालक मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एन.आर. पाटील,उपमुख्याध्यापक श्री. आर.एल.पाटील,पर्यवेक्षक श्री.ए.बी.अहिरे, सौ.ए.आर. गोहिल, श्री.आर.बी.तडवी, तांत्रिक विभाग प्रमुख श्री. एस.एन.पाटील, किमान कौशल्य प्रमुख श्री.एम.बी. बाविस्कर, कार्यालय प्रमुख श्री. अजय सिनकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.