प्रकाश तेली यांच्या साहित्य कार्यातुन समाज परिवर्तनाचे कार्य होत आहे – अभिनेता सिद्धार्थ जाधव

प्रकाश तेली यांच्या साहित्य कार्यातुन समाज परिवर्तनाचे कार्य होत आहे – अभिनेता सिद्धार्थ जाधव

 

 

 

जळगांव :- प्रसिद्ध साहित्यकार प्रकाश तेली यांचे साहित्य कार्य हे समाज परिवर्तनाचे कार्य करीत असून समाजाल दिशा देखील देत आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी प्रकाश तेली यांच्या सोबतच्या भेटीप्रसंगी काढले. प्रकाश तेली यांनी लिहिलेली विविध सामाजिक पुस्तके ही सिद्धार्थ जाधव यांची भेट घेऊन दिली.

 

प्रकाश तेली हे सामाजिक कवी, लेखक, पत्रकार व गीतकार असून त्यांनी विविध सामाजिक विषयांवर लिखाण हे केलेल आहे. प्रकाश तेली यांचे साहित्य कार्य हे अभिनव असून त्यांचे पंधरा सामाजिक कविता संग्रह हे प्रकाशित झालेले आहे.

 

प्रकाश तेली यांनी पाच हजार पेक्षा जास्त सामाजिक व इतर कविता ह्या लिहिलेल्या असून सात हजार पेक्षा जास्त घोषवाक्य हे लिहिलेले आहेत. प्रकाश तेली यांनी काव्य आणि घोषवाक्य लेखनाचा जागतिक विक्रम केलेला आहे. त्यांच्या कार्याची विविध रेकॉर्ड बुक्स मध्ये नोंद झालेली आहे.