विधान परिषदेचे नवनिर्वाचित सभापती ना.राम शिंदे यांचा हॅट्ट्रिक आमदार राजळे यांच्या कडून जिल्ह्याच्या वतीने सन्मान
(सुनिल नजन “चिफब्युरो” अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सोळा डिसेंबर पासून सुरू झाले आहे. नवनिर्वाचित मंत्री मंडळाचा शपथविधी सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आल्या नंतर भाजपने धनगर समाजचे नेते प्रा.राम शिंदे आणि आमदार गोपिचंद पडळकर यांना मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने धनगर समाजात भाजपच्या विरोधात तीव्र लाट उसळली होती.हे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले.आणि त्यांनी लगेचच विधान परीक्षेच्या सभापती पदासाठी प्राध्यापक राम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहात सरकारचे स्पष्ट बहुमत असल्याने विरोधी पक्षांकडून सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे भाजपचे राम शिंदे यांची सभापती पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. ना.राम शिंदे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड तालुक्यातील आमदार असल्याने २२२ शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिका ताई राजळे यांनी तातडीने अधिवेशन काळात सभापती झालेल्या नामदार राम भामाबाई शंकर शिंदे यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला.कारण आमदार राजळे यांना धनगर समाजाने भरभरून मते दिलेली आहेत.वास्तविक पाहता आमदार मोनिकाताई राजळे यांना मंत्री पद मिळेल अशी मतदार संघातील सामान्य मतदारांची अपेक्षा होती.परंतू अहमदनगर जिल्ह्याचे किंग मास्टर महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदरात मंत्री पद पाडून घेण्यासाठी व्युहरचना केल्यामुळे जिल्ह्यातील दहा आमदारा पैकी कोणालाही मंत्री पद मिळाले नाही.विखेंना मंत्री पद मिळाल्याने अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा दक्षिण उत्तर हा उफाळून येण्याची चिन्हे निर्माण झाली होती हे ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुद्सद्दीपणा येथे दिसून आला.त्यांनी घाईघाईने विधानपरिषद सभापती पदासाठी ना. शिंदे यांचे नाव पुढे करून सभापती पदाची माळ शिंदे यांच्या गळ्यात टाकून अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण उत्तर हा मंत्री पदाचा वाद उफाळून येण्या अगोदरच मिटविला. शिंदे यांची सभापती पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली हे व्रुत्त सोशल मीडिया वर झळकताच धनगर समाजाच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी नामदार शिंदे यांच्या अभिनंदनाचे फलक लावण्यात आले आहेत. धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे म्हणून नवनिर्वाचित विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी तातडीने पुढाकार घ्यावा अशी महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या वतीने एसटी आरक्षणासाठीची मागणी जोर धरू लागली आहे. सरकार धनगर समाजाला एसटी आरक्षण कधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.