डॉ. नरेंद्र कुंदर केनियाचे, राजेंद्र साप्ते दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक
खो-खो च्या प्रचार व प्रसारासाठी
दिल्लीतील पहिल्या जागतिक खो-खो स्पर्धेत परदेशातील खेळाडूंना मार्गदर्शन करणार
धाराशिव, दि. १८ डिसेंबर –
खो-खो च्या प्रचार व प्रसारासाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. नरेंद्र कुंदर (मुंबई उपनगर) व राजेंद्र साप्ते ( पुणे) हे अनुक्रमे केनिया व दक्षिण आफ्रिकेच्या खो खो संघाना प्रशिक्षण देणार आहेत. तशी संधी त्यांना खो खो फेडरेशन ऑफ इंडियाने दिली असल्याची माहिती, फेडरेशनचे सहसचिव तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी दिली.
दिल्ली येथे 13 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत पहिली जागतिक अजिंक्यपद खो खो स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या केनिया व दक्षिण आफ्रिका या संघांना ते मार्गदर्शन करणार आहेत. हे दोघेही लवकरच दोन्ही देशात जाऊन संबंधित देशाच्या संघाला मार्गदर्शन करतील. त्यांचे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ऍड. गोविंद शर्मा यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
——
थोडक्यात कामगिरी :
डॉ. नरेंद्र वि.कुंदर : एमपीएड, पीएचडी, एनआयएस प्रशिक्षित प्रशिक्षक. प्रा. जनार्दन लक्ष्मण शिर्सेकर शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यामंदिर वांद्रे मुंबई येथे क्रीडा शिक्षक. महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी संघाचे मुख्य खो खो प्रशिक्षक.२०१० चा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन. २०१६ साली १२ व्या साउथ एशियन खेळात खो खो क्रीडाप्रकारात सुवर्णपदक विजेत्या भारतीय खो खो संघाचे प्रशिक्षक. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या कुमार, मुली, महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती व सर्व गटात सुवर्णपदक प्राप्त. राष्ट्रीय खो खो पंच. २००६ पासून महाराष्ट्र खो खो असोसिएशन तांत्रिक समिती सदस्य, २०१४ पासून सचिव. वांद्रे येथील शिर्सेकर महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी संघाचे मुख्य खो खो प्रशिक्षक. आतापर्यंत ७५ हून अधिक खेळाडूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. ३ खेळाडूंनी खो खो खेळाकरिता भारताचे प्रतिनिधित्व. ४ खेळाडूंना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय स्पर्धेत दिले जाणारे एक खेळाडू राणी लक्ष्मीबाई पुरस्कार,
एक खेळाडू एकलव्य पुरस्कार, दोन खेळाडू वीर अभिमन्यू पुरस्कार प्राप्त. २०१६ मध्ये गुजरात क्रीडा विभागाच्या उन्हाळी शिबिरात २५ दिवसाचे खो खो खेळाचे प्रशिक्षण दिले. त्याचाच परिणाम गुजरात राज्याचे खो खो संघ खेलो इंडिया स्पर्धेत तसेच राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल स्थानावर.
——-
राजेंद्र मोतीराम साप्ते : बी.ए., एन. आय.एस. प्रशिक्षित प्रशिक्षक पदविका. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे १९९८ पासून, जालना, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे – मुख्यालय, येथे राज्य क्रीडा मार्गदर्शक सन २०२२ पर्यंत. ऑक्टोबर २०२२ मध्ये तालुका क्रीडा अधिकारी हिंगणा, नागपूर येथे कार्यरत. संन्मित्र संघ, पुणे व खेळातील प्राथमिक धडे रमणबाग मित्र मंडळ, पुणे शालेय, राज्य, विद्यापीठ स्पर्धा, कॉलेज जीवनापासून खेळ शिकविण्याकडे लक्ष. १९९८ आज रोजी पर्यंत पासून क्रीडा विभागच्या शालेय, महिला व ग्रामीण, पायका या राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत निवड समिती व प्रशिक्षक म्हणून १४, १७,१९ वयोगटासाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती. सर्व खेलो इंडिया राज्य व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड समिती सदस्य व प्रशिक्षक नियुक्ती. महाराष्ट्र खो खो असोसिएशन १४ वर्ष व वरीष्ठ गटासाठी राष्ट्रीय, फेडरेशन, पश्चिम विभाग, निमंत्रित स्पर्धेत प्रशिक्षक नियुक्ती. २०१६ मध्ये तिस-या अशियाई खो खो स्पर्धा पुरुष गटासाठी प्रशिक्षक. २०१८ मध्ये पहिली आंतरराष्ट्रीय टेस्ट सिरीज इंग्लड येथे पुरुष गटासाठी प्रशिक्षक. २०१७ इंग्लड संघाचा भारत दौरामध्ये एरेली येथे संघासाठी मार्गदर्शन वर्ग. २०१९ खो खो प्रिमिअर लीग प्रशिक्षण शिबिर, दिल्ली. २०२१ प्रशिक्षकांचे व खेळाडूंचे राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर व प्रो स्पर्धा फरीदाबाद / दिल्ली. २०२१ राष्ट्रीय प्रशिक्षक डेव्हलपमेंट प्रोग्राम फरीबदाबाद. २०२३ महाराष्ट्र खो खो असोसिएशन प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिर. २०२४ राष्ट्रीय प्रशिक्षक डेव्हलपमेंट प्रोग्राम. २०२२ राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर व अल्टीमेट लीग प्रशिक्षण शिबिर, बालेवाडी पुणे. २०२२ अल्टीमेट खो खो लीग स्पर्धा मुंबई खिलाडी मुख्य प्रशिक्षक. क्रीडा शिक्षक यांचेसाठी चार वर्ष राज्यस्तरीय मास्टर प्रशिक्षणाचे संपुर्ण नियोजन व आयोजन. राष्ट्रीयस्तरावरील पायका अंतर्गत मास्टर ट्रेनिंग प्रोग्राम – झाशी – एलएनयुपी. जिल्हा व विभागीयस्तर क्रीडाश्री प्रशिक्षण करता तज्ञ / रिसोर्स पर्सन म्हणून सहभाग. खो खो प्रशिक्षकांसाठी राज्यस्तर प्रशिक्षण कार्यक्रम लोणावळा नियोजन व आयोजन. रत्नागिरी येथे विविध माध्यमातून खो खो स्पर्धा, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन वर्ग.