चोपडा महाविद्यालयात “सूक्ष्मजीवशास्त्रातील शाश्वत विकास” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन
चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी एन्झाईम प्रा.लि.मुंबई येथील आर. अँड डी. विभागाचे प्रमुख डॉ. वासुदेव झांबरे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी हे तसेच उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम.बागुल आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ.वासुदेव झांबरे यांनी विद्यार्थ्यांना ‘शाश्वत विकासासाठी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाची भूमिका’ यावर भाष्य केले तसेच पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांना असलेल्या संशोधनातील संधी यावर देखील प्रकाश टाकला.
यावेळी प्रा.डॉ.आर.एम.बागुल यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी विभाग प्रमुख वैशाली सोनगिरे , भावना पाटील,पूजा सोनवणे,जाहिद मनियार, तसेच वनस्पतीशास्त्र विभागातील डॉ.पी.एन.सौदागर, स्नेहल शिंदे, जया बोरसे आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वसीम पटेल यांनी केले तर आभार पूजा पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेंद्र क्षिरसागर व रवींद्र पाटील तसेच शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी यांचे सहकार्य लाभले.