के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे अविष्कार २०२४ स्पर्धेत यश

के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे अविष्कार २०२४ स्पर्धेत यश

 

 

के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे अविष्कार २०२४ स्पर्धेत यश : कवयित्री बहिणाबाई चौधरी चे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव द्वारे चोपडा येथील दादासाहेब डॉ सुरेश जी .पाटील महाविद्यालय चोपडा येथे घेण्यात आलेल्या अविष्कार २०२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत दि ५ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या स्पर्धेत जवळपास २००० विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या श्रेणीत संशोधन पोस्टर द्वारे सादर केले .के सी ई महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागातील ५ टीम पैकी चार टीम ची पुढील फेरी साठी निवड झाली . या प्राथमिक फेरी मध्ये वैष्णवी सूर्यवंशी , श्वेता तायडे ,प्रज्ञा चौधरी ,गायत्री चौधरी ,हर्ष कोटेचा ,साक्षी सोनावणे ,दिव्या चौधरी या सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन स्पर्धेतील प्रथम फेरीत यश मिळविले . या विद्यार्थ्यांनी डिजिटल मार्केटिंग ,आर्टीफिसिअल इंटेलिजन्स ,डेव्हलोपमेंट ऑफ अनऑर्गनाईज्ड सेक्टर अश्या विविध विषयावर अविष्कार २०२४ स्पर्धेत सादरीकरण केले .के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी व अविष्कार २०२४ चे समनव्यक प्रा कोमल जैन यांनी मार्गदर्शन करून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले पुढील विजेत्या फेरीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाकरिता प्रा हर्षा देशमुख ,डॉ वीणा भोसले ,प्रा शेफाली अग्रवाल ,प्रा डिगंबर सोनवणे ,प्रा तनया भाटिया ,प्रा गोडबोले ,प्रा हेमंत धनधरे ,प्रा देवेंद्र पाटील व प्रा रेवती पाटील यांचे सहकार्य लाभले.