पाचोऱ्यात माजी. नगरसेविका हर्षाली दत्तात्रय जडे यांनी अतिक्रमण संदर्भात न.पा.प्रशासन दिले निवेदन
माझ्या परिसरातील जुन्या कोर्टी शेजारील रस्ता हा अत्यंत वर्दळीचा असून हा रस्ता आठवडे बाजारापासून ते छ.शिवाजी महाराज चौकात जाण्यासाठी शॉर्टकट आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी ‘वर्दळ असते. परंतु हा रस्ता प्रत्यक्षात ५ फुटाचा आहे. पण शेजारील जागा मालकाची जागा बखळ असल्याने आजपावेतो रहदारीस काही अडचण आली नव्हती. परंतलू आता रस्त्या शेजारील जागा मालकाने आपल्या जागेत कंपाऊंड वाळल्याने आता हा रस्ता पुन्हा फक्त पाचच फुटाचा उरला आहे. त्यामुळे वाहतुकस अडथळा निर्माण झाला आहे. तसेच सोनार गल्ली हा भाग सराफी व्यवसाईकांचा असून अत्यंत वर्दळीचा आहे. व या रस्त्याच्या समस्येमुळे त्यांचे व्यवसायावर परिणाम होत आहे. जंगी मोहल्ला, सोनार गल्ली, कोळी गल्ली या भागात फोर व्हीलर, मोठे वहान जाण्यास दुसरा मार्ग नाहीं. परीणामी या भागात काही दुर्घटना घडल्यास अग्नीशामन वाहन व ऑम्बुलन्स सारखे वाहन जाण्यास मार्ग नाही. तरी माझी आपणांस विनंती आहे की, सदर समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन जागामालकाशी चर्चा करुन किंवा शासकीय स्तरावर या संदर्भात काय मार्ग निघू शकतो याची आपण चाचपणी करुन लवकरात लवकर मार्ग काढून हा रस्ता पुन्हा प्रशस्त करुन द्यावा ही विनंती.