प्रकाश तेली यांचा उत्कृष्ट साहित्य कार्याबद्दल सृजन श्री पुरस्काराने गौरव  

प्रकाश तेली यांचा उत्कृष्ट साहित्य कार्याबद्दल सृजन श्री पुरस्काराने गौरव

 

जळगांव:- हिंदी साहित्य गंगा संस्था जळगांव यांच्या तर्फ दि. १ डिसेंबर रोजी जळगाव येथे प्रकाश तेली यांचा उत्कृष्ट साहित्य कार्याबद्दल सृजन श्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला ह्याप्रसंगी संस्था अध्यक्ष सोनी, सचिव सुनील पांडे, सचिव प्रकाश बारी, वरिष्ठ साहित्यिक पल्लवी बनसोडे व देशभरातील अनेक वरिष्ठ साहित्यिक लेखक, कवी इतर अनेक मान्यवर हे उपस्थित होते. प्रकाश तेली ह्यांचे आतापर्यंत 15 सामाजिक काव्य संग्रह हे प्रकाशित झालेले असून त्यांच्या कार्याचे भारतरत्न, ज्ञानपीठ, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखकांनी कौतुक केले असून त्यांच्या अनेक पुस्तकाना राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, वरिष्ठ अधिकारी, कुलगुरू व अन्य मान्यवर यांनी त्यांना शुभेच्या संदेश हे पाठविलेले आहेत.

 

 

 

 

कशाबद्दल मिळला प्रकाश तेली यांना पुरस्कार :- प्रकाश तेली हे साहित्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत असून समाजाला जागृत करण्याचे काम करीत आहेत त्यांनी विविध सामाजिक व प्रबोधनात्मक विषयांवर 5000 पेक्षा जास्त कविता व 7000 पेक्षा जास्त घोष वाक्य हे लिहिलेले आहेत त्यांनी कविता व घोष वाक्य लेखनाचा जागतीक विक्रम केलेला असून त्यांच्या साहित्य कार्याची नोंद ही एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झालेली आहे त्यांच्या ह्या अनोख्या व उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना सृजन श्री पुरस्कराने सन्मानित करण्यात आले. प्रकाश तेली यांना ह्यापूर्वी देखील अनेक पुरस्कार मिळाले असून त्यांचे विविध स्तरावरून कौतुक होत आहे.