साक्री तालुक्यातील विद्यार्थी होणार संगणक साक्षर- आ. सत्यजीत तांबे यांच्या विकास निधीतून ७ शाळांना संगणक व ८ शाळांना पोडियमचे वाटप

साक्री तालुक्यातील विद्यार्थी होणार संगणक साक्षर- आ. सत्यजीत तांबे यांच्या विकास निधीतून ७ शाळांना संगणक व ८ शाळांना पोडियमचे वाटप

 

 

प्रतिनिधी, साक्री

 

सध्याचे युग हे डिजीटल युग असून, विद्यार्थ्यांना जगाची ओळख आपल्या शाळेत बसून व्हावी. तसेच शिक्षकांनाही संगणकीय कामासाठी या संगणक संचाचा फायदा व्हावा या हेतूने आमदार सत्यजीत तांबे यांनी विकास निधीतून साक्री तालुक्यातील शाळांना संगणक संचाचे वाटप केले. शासकिय विश्राम गृह साक्री, जि.धुळे. येथे ७ शाळांना संगणक संचांचे आणि ८ शाळांना पोडियमचे वितरण करण्यात आले.

 

शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे, ऑनलाईन शिक्षणाची गरज, डिजिटल शाळा व मुलांना संगणकाची आवड निर्माण व्हावी, या सर्व बाबींचा विचार करून शाळेमध्ये संगणक असणे गरजेचे आहे. त्यामुळे शाळेला संगणक मिळावा, अशी मागणी शाळेकडून करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रणालीचे शिक्षण मिळावे या हेतूने आमदार सत्यजीत तांबे यांनी शाळांमध्ये संगणक संच आणि पोडियमचे वाटप केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणकाच्या माध्यमातून आता आधुनिक पद्धतीने शिक्षण घेता येणार आहे.

 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संगणकाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीस वाव मिळावा व शहरी भागा सारखे अत्याधुनिक प्रणालीचे शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाच्या माध्यमातून घेता येणार आहे.

 

सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे असून सर्वच ठिकाणी संगणकाचा उपयोग होत आहे. डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीसाठी शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना संगणक हाताळण्याचे कौशल्य प्राप्त झाले पाहिजे. या हेतूने शाळांना संगणक दिल्याचे आ. सत्यजीत तांबे यांनी सांगितले.