शेवगावात शुभम सर्व्हिस सेंटर चा शुभारंभ थाटात संपन्न !

शेवगावात शुभम सर्व्हिस सेंटर चा शुभारंभ थाटात संपन्न !

 

(सुनिल नजन”चिफ ब्युरो”अहिल्यानगर जिल्हा) अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील आखेगाव रोडवरील शुभम सर्व्हिस सेंटर चा शुभारंभ थाटात संपन्न झाला. शेवगाव तालुक्यातील जनशक्ती मंचचे महासचिव जगन्नाथ पाटील गावडे यांच्याहस्ते आणि विनायक नजन सर,सागर फडके,लक्ष्मण भिसे,छबुराव मिसाळ, आबासाहेब मिसाळ, पोलीस हवालदार देविदास वाघमारे मेजर या प्रमुखांच्या उपस्थितीत या सर्व्हिस सेंटरचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रसिद्ध उद्योजक जगन्नाथ पाटील गावडे म्हणाले की आजकालच्या तरूणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराची निवड करून उद्योग व्यवसायाकडे वळले पाहीजे. स्वतः चा रोजगार स्वतःच निर्माण केला पाहीजे.

उद्योग व्यवसायात चढउतार निश्चितच आहेत पण माणूस उपाशी रहात नाही. नवयुवकांनी दुसर्‍याची चाकरी करण्या पेक्षा स्वतःच मालक बनले पाहीजे असा सल्ला गावडे पाटील यांनी दिला. या कार्यक्रमास शिवाजी तोतरे, पांडुरंग गाडेकर, गंगाधर दातीर सर,नितिन खेडकर, संदिप जाधव,दत्तात्रय भोसले, गावडे महाराज,कैलास शिंदे,विशाल गिरगुणे, किशोर लांडगे, अभिराज भिसे, महादेव मिसाळ, स्वप्नील भिसे,काकासाहेब भाकरे,रोहिदास भाकरे,दादासाहेब पाचरणे,बाबा शिरसाठ,बबन मिसाळ,गणेश महाराज डोंगरे, होमगार्डच्या नेत्या रेशमाताई चांडक, मिना मिसाळ, यांच्यासह अनेक मान्यवर मोठय़ा संखेने हजर होते. आभार प्रदर्शन संचालक शुभम् मिसाळ यांनी मानले. आभार मारताना त्यांनी असे सांगितले की सर्व प्रकारच्या टूव्हीलर गाड्यांची कामे खाञीशीर रीत्या केली जातील तरी पंचक्रोशीतील ग्राहकांनी त्वरित संपर्क साधून आपला सहभाग नोंदवावा.आणि सहकार्य करावे.