द अकादमी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘TASfinity Initiative’ चे केले आयोजन
प्रतिनिधी, पुणे
द अकादमी स्कूल, पुणे तर्फे TASfinity चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण, सर्जनशीलता आणि सांघिक कार्य प्रदर्शित करणे हा उपक्रमाचा उद्देश होता. हा कार्यक्रम इयत्ता ६ ते १० मधील विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. यामध्ये जेवण, मनोरंजन आणि खेळ यांचा समावेश होता, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी फूड स्टॉल,अनेक क्रीडा उपक्रम आणि कॅम्पसमध्ये तयार केलेली सजावट यांचे प्रदर्शन करण्यात आले होते.
या उपक्रमादरम्यान इयत्ता ६ ते १० पर्यंतचे विद्यार्थी दोन गटात विभागले गेले होते. गट अ ने क्रीडा क्रियाकलापांची जबाबदारी घेतली होती. तर गट ब ने शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खाद्य स्टॉल आयोजित करून नाविन्यपूर्ण पदार्थ तयार केले होते. या कार्यक्रमात विविध खेळ आणि स्पर्धा देखील पाहायला मिळाल्या, ज्यात इयत्ता ४ ते १० पर्यंतचे विद्यार्थी सामील झाले होते. मनोरंजनासोबतच TASfinity ने विद्यार्थ्यांसाठी शिकण्याची मौल्यवान संधी देखील दिली. “विद्यार्थ्यांनी केवळ स्टॉल्स आणि गेम्स डिझाइन केले नाहीत तर इव्हेंट लॉजिस्टिक्सचे व्यवस्थापन देखील केले. विद्यार्थ्यांनी गणित (अर्थसंकल्प आणि वित्त), विज्ञान (अन्न सुरक्षा आणि वीज), कला (स्टॉल सजावट) आणि इंग्रजीत प्रमोशनल कम्युनिकेशन कसे करावे आणि त्यांच्या सर्जनशीलता आणि कल्पनांचे स्वतंत्रपणे विपणन कसे करावे हे देखील शिकवले असल्याचे टासच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैथिली तांबे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचा खास भाग म्हणजे या कार्यक्रमाच्या संकल्पनेपासून ते अंमलबजावणीपर्यंत ची सर्व जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पाडली. कार्यक्रमाची रचना, टीमवर्क, नियोजन, निर्णय घेणे आणि आर्थिक व्यवस्थापन यांसारखी कौशल्ये विकसित करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बजेट तयार करणे, कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणे, त्यांच्या स्टॉलचा प्रचार करणे आणि सुरळीत अंमलबजावणी करणे याची जबाबदारी घेऊन ती योग्यरीत्या पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले.” असे देखील डॉ. तांबे म्हणाल्या.