महात्मा गांधी शिक्षण मंडळातर्फे कै.ना.मा. अक्कासाहेब श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘रक्तदान शिबीराचे’ आयोजन

महात्मा गांधी शिक्षण मंडळातर्फे कै.ना.मा. अक्कासाहेब श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘रक्तदान शिबीराचे’ आयोजन

 

चोपडा: कै.ना.मा.अक्कासाहेब श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील(माजी शिक्षणमंत्री,महाराष्ट्र) यांच्या स्मृतिदिनानिमित्त दि.०४ डिसेंबर २०२४ रोजी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या अनुदानित डी. फार्मसी व नर्सिंग विभागाच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी शिक्षण मंडळ, चोपडा येथे दरवर्षीप्रमाणे ‘रक्तदान शिबीराचे’ आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील तसेच सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते कै. ना. मा.अक्कासाहेब श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील (माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आले.

या शिबीरात एकूण ५० पिशव्यांचे रक्त संकलन जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय पथकाच्या वतीने करण्यात आले.

या शिबीराप्रसंगी संस्थेचे कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी उत्साहाने रक्तदान केले. या शिबीरात सहभागी झालेल्या दात्यांनी मानवी सेवा म्हणून आपले योगदान दिले.

याप्रसंगी उदघाटनाच्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील यांनी ‘रक्तदान ही अत्यंत महत्वपूर्ण सामाजिक जबाबदारी असून, या उपक्रमाद्वारे अनेकांना जीवनदान मिळते.या उपक्रमातून संस्थेची सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये सेवा भावनेची जाणीव निर्माण होत आहे’ असे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी रक्तदानाच्या महत्वावर प्रकाश टाकला आणि रक्तदात्यांचे कौतुक केले.

यावेळी संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे प्राचार्य डॉ. डी.ए. सूर्यवंशी, प्रा. पंकज वळवी, प्रा. सौ. करुणा चंदनशीव, प्रा.अतुल चौधरी आणि वैद्यकीय पथक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे आभार मानले तसेच त्यांच्या या उदार कृतीचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे आयोजन नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. ज्यामुळे रक्तदान करणाऱ्यांचे मनोबल वाढले. यावर्षीच्या रक्तदान शिबिराने संस्थेच्या समाजसेवेची परंपरा अधिक दृढ केली असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.या शिबिराच्या यशस्वितेसाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.