के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात म्युझिक क्लब स्थापन
के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात म्युझिक क्लब स्थापन :के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात म्युझिक क्लब स्थापन करण्यात आला . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस आर सुगंधी यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले . क्लबची जबाबदारी प्रा रेवती पाटील व देवेंद्र पाटील त्यांच्यावर सोपवण्यात आली . उदघाटनाप्रसंगी डॉ सुगंधी सरानी संगीताचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले . त्यांनी आपल्या भाषणात सांगितले कि आयुष्यात प्रत्येक वळणावर आणि क्षणा -क्षणाला संगीत आपल्याला साथ देत असते . प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःखाचे क्षण येत असतात ,अश्या तणावातून बाहेर पडण्यास संगीत मुख्य भूमिका निभावत असते . सर्व विद्यर्थ्यांना संगीत यामध्ये आपण स्वतःचा सहभाग नोंदवावा व असलेल्या सुविधेचा पुरेपूर फायदा घ्यावा . संगीत हे माणसाला मानसिक स्वास्थ प्रदान करण्याचे उत्तम माध्यम आहेत . संगीत ऐकल्याने मन प्रसन्न व ताजे तवाने होते असे भाषणात सांगितले .