पाचोऱ्यात जागतिक एड्स दिना निमित्त जनजागृती रॅली
दि. 2 डिसेंबर २०२४ रोजी जागतिक एड्स दिना निमित्त आय.सी.टी.सी. विभाग ग्रामीण रुग्णालय पाचोरा व साईनाथ सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि डॉ.वाय. पी.युवा फाउंडेशन एन.जी.ओ. खडकदेवळा बु. व गो.से.हायस्कूल पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा ग्रामीण रुग्णालयापासून छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई इतर भागात एच.आय.व्ही.एड्स जनजागृतीपर अभियान रॅली काढण्यात आली गो.से. हायस्कूल पाचोरा चे विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन जागृती रॅली सहभाग घेतला एच.आय.व्ही.एड्स जनजागृतीपर
जागतिक एड्स दिना विषेश महत्व, एचआयव्ही म्हणजे काय? एचआयव्ही व एड्स यातील फरक, एचआयव्ही होण्याची प्रमुख कारने कोणती? विशेष घाव्याची काळजी, समाजातील गैरसमज,उपचार व एचआयव्ही बाधित व्यक्तींना योग्य समानतेची वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न करणे या सर्व मुद्यांवर ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथील समुपदेशक श्रीमती लता चव्हाण व प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री.श्रीकांत भोई यांनी माहिती मार्गदर्शन केले तसेच सर्व उपस्थितांनी शपथ घेतली.
सदर कार्यक्रमास मा.जिल्हा शल्य चिकित्सक , मा.जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रम अधिकारी जळगांव, मा.वैद्यकिय अधिक्षक डाँ.सतिष टाक सर यांच्या मार्गदर्शन लाभले. तसेच ग्रामीण रुग्णालयातील डाँ. अमित साळुंखे, डाँ.विजय पाटील, डाँ.तेली, डाँ.सोनवणे, डाँ.शेख, डाॅ.नानकर, डाँ.भावसार व सर्व कर्मचारीवर्ग व गो.से.हायस्कूल पाचोरा येथील शिक्षक श्री.आर.एन.ठाकरे, श्री.एल. टी.पाटील सर उपस्थित होते.