संघ भावना आणि जिद्दीने महाराष्ट्राचा सुवर्ण विजय – गोविंद शर्मा

संघ भावना आणि जिद्दीने महाराष्ट्राचा सुवर्ण विजय – गोविंद शर्मा

 

महाराष्ट्र खो-खो संघाच्या अलीगड येथे झालेल्या ४३व्या कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील दिमाखदार विजयावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे खजिनदार गोविंद शर्मा यांनी संघाच्या मानसिकतेचा आणि जिद्दीचा गौरव केला.

 

“आपला खेळाडू फक्त खेळण्यासाठीच नव्हे, तर सुवर्ण पदक जिंकण्यासाठी मैदानात उतरतो. त्याच्यातील जिद्द, चिकाटी आणि संघ भावना यामुळे आपण नेहमी विजयी होतो,” असे गोविंद शर्मा यांनी सांगितले.

 

संघटित खेळ आणि विजयासाठीची वृत्ती

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी कठीण प्रसंगांमध्येही संघभावनेने खेळ करण्याची क्षमता सिद्ध केली आहे. “आपला संघ कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला कधीच कमकुवत समजत नाही. प्रत्येक सामन्यात आपला संघ शेवटपर्यंत विजयासाठी झुंजतो,” असे त्यांनी नमूद केले.

 

सामन्यावरची पकड कायम ठेवण्याची कला

शर्मा यांनी सांगितले की, महाराष्ट्राचा संघ कोणत्याही सामन्यावरची पकड सोडत नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी प्रयत्नशील राहतो. “याच वृत्तीमुळे महाराष्ट्राचा संघ सातत्याने सर्वोच्च कामगिरी करतो,” असे त्यांनी सांगितले.

 

यशामागील मूल्यं

संघाच्या संघटनाबद्दल आणि खेळाडूंच्या समर्पणाबद्दल बोलताना गोविंद शर्मा म्हणाले, “महाराष्ट्राच्या यशामागे प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, व्यवस्थापनाचे भक्कम पाठबळ आणि खेळाडूंची मेहनत आहे. आपले खेळाडू सुवर्ण विजयाचे ध्येय ठेऊन खेळतात, आणि त्यांची जिद्दच महाराष्ट्राला सतत यशस्वी बनवते.”

 

महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या या जिद्दीने व समर्पणाने भविष्यातही राज्याला अनेक गौरव मिळवून देण्याची खात्री शर्मा यांनी व्यक्त केली.