श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे संविधान दिन उत्साहात संपन्न
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.
.. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. एम. टी. कौंडीण्य सर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व सांगितले व संविधानाची शपथ घेतली.
.. यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन.आर. ठाकरे सर, उपमुख्याध्यापक श्री. आर.एल. पाटील सर, पर्यवेक्षक श्री. ए. बी.अहिरे सर, सौ. अंजली गोहिल मॅडम, सांस्कृतिक विभाग उपप्रमुख श्री.आर. बी. बोरसे सर व इतर शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.