शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजिनामा देताच बहिणीला आली भोवळ, पैसे बंद झाल्याने लाडक्या बहिणीवर आली अश्रू ढाळण्याची वेळ! तेल ही गेले,तुपही गेले,हाती धुपाटणे आले अशी लाडक्या बहिणीची अवस्था?
(सुनिल नजन “चिफब्युरो” अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताच “मुख्यमंत्री लाडकी बहिण ” ही अत्यंत लोकप्रिय झालेली व महिलांसाठी राबवलेली योजना बंद करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून सरकारला देण्यात आले आहेत.त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीवर आता भोवळ येउन अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे.महाविकास आघाडीचे नेते खरोखरच सांगत होते की तुमचे मत घेईपर्यंत ही योजना सुरू राहील ते तंतोतंत खरे ठरले आहे.सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाने हे आदेश सर्व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. निवडणूक आयोगाकडून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मतदारावर आर्थिक लाभ देऊन प्रभाव टाकणारी योजना आहे.ती ताबडतोब थांबवा असे आदेश सरकारला देण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तमाम महिला वर्गात सरकार विषयी संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षाला आता महिला वर्गात आग लावायला आयते कोलीत मिळाले आहे.निवडणूक आयोगाकडून सरकार तर्फे आर्थिक लाभ देऊन मतदारावर प्रभाव टाकणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यात आला होता. त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ देत असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आल्यानंतर ही योजना तात्काळ थांबविण्याचे आदेश सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाला देण्यात आले आहेत.” तेल ही गेले,तुपही गेले,हाती धुपाटणे आले”अशी अवस्था मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीची झाली आहे. विरोधी पक्ष या निर्णयाच्या विरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आवाज उठवून महिला वर्गाचे सरकारच्या विरोधात डोके भडकावन्याचे काम करणार असल्याचे दिसून येत आहे.आता महिला वर्गाची कशी समजूत काढावी हा फार मोठा यक्ष प्रश्न सरकार पुढे निर्माण झाला आहे.