हॅटट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांना मंञीपद न दिल्याने मतदारसंघात तीव्र नाराजी ?

हॅटट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांना मंञीपद न दिल्याने मतदारसंघात तीव्र नाराजी ?

 

(सुनिल नजन “चिफ ब्युरो”अहिल्यानगर जिल्हा) अहमदनगर जिल्ह्यातील 222 शेवगाव – पाथर्डी विधान सभा मतदारसंघात तिसऱ्यांदा निवडूण येण्याची हॅटट्रिक करणाऱ्या आमदार मोनिकाताई राजळे या जिल्ह्यातील एकमेव महिला उमेदवार आहेत.आमदार राजळे यांना 99,775 मते मिळवून त्या विजयी झालेल्या आहेत.विरोधी गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापराव ढाकणे यांना 80,732 मते , चंद्रशेखर घुले यांना 57,988 मते,तर हर्षदाताई काकडे यांना 12232 मते तर किसनराव चव्हाण सर यांना 4437 मते मिळाली आहेत. आमदार राजळे यांना ढाकणे यांच्या पेक्षा 19,043 मते जास्त मिळाली.आमदार मोनिकाताई राजळे या जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार आहेत.तिसऱ्यांदा निवडूण आल्याने त्यांना मंञीपद मिळणे आवश्यक होते.परंतू मंञीपदासाठी जिल्ह्यातील महायुतीतील नेत्यांकडून गटबाजी उफाळून आली आहे.भाजपचे शिर्डीतील उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील , राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून अहमदनगर शहरातील आमदार संग्राम जगताप, आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे संगमनेर मधून नव्यानेच निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांना मंञीपदे देण्यात आली आहेत. आमदार मोनिकाताई राजळे या मंञीपदाच्या प्रबळ दावेदार असताना त्यांना डावलण्यात आले आहे त्यामुळे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात तीव्र नाराजी पसरली आहे.कोणताही आमदारकीचा अनुभव नसणाऱ्या नवीन आमदार खताळांना मंञीपद देऊन अनुभवी आमदार मोनिकाताई राजळे यांच्यावर अंन्याय केला गेला असल्याची भावना मतदारसंघात निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील “सोधा” पक्ष कमालीचा कार्यरत होऊन मंञीपदासाठी जोरदार लाॅबींग करण्यात आल्याचे दिसून येत आहे. सोधा पक्षातील बाळासाहेब थोरात आणि शंकरराव गडाख हे पराभूत झाल्या नंतर आमदार मोनिकाताई राजळे या एकाकी पडल्या आहेत.किमान राज्यमंत्रिपद तरी मिळावे अशी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातील सर्व सामान्य मतदारांची मागणी आहे.