साखर सम्राटाच्या चक्रव्यूहातून शेवगावला सोडवा,काकडेची रिक्षा मुंबईला पाठवा : सचिन घायाळ

साखर सम्राटाच्या चक्रव्यूहातून शेवगावला सोडवा,काकडेची रिक्षा मुंबईला पाठवा : सचिन घायाळ

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” अहिल्यानगर जिल्हा) अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याला आता साखर सम्राटाच्या चक्रव्यूहातून सोडवा आणि हर्षदाताई काकडेंची रिक्षा थेट मुंबईला पाठवा असे उदगार पैठणच्या संत एकनाथ साखर कारखान्याचे चेरमन सचिन घायाळ यांनी काढले ते अपक्ष उमेदवार सौ.हर्षदाताई काकडे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत पाथर्डी येथे बोलत होते.यावेळेस व्यासपीठावरील अमोल खेडकर, रमेश महाराज राठोड, माणिक गर्जे,जगन्नाथ पाटील गावडे,राजेश मढीकर,रामकिसन घनवट,अँडव्होकेट शिवाजीराव काकडे, कवी अंकुश आरेकर यांची भाषणे झाली.हर्षदाताई काकडे यांनी त्यांच्या विरोधातील सर्व उमेदवारावर जोरदार टीका केली.चेरमन सचिन घायाळ यांनी तर हर्षदाताई काकडेच्या प्रचाराचे काम करतो म्हणून थेट महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापकाका ढाकणे यांच्या काही कार्यकर्त्यांनी मला फोनवरून शिव्या दिल्या आणि मी शिवसैनिक असल्याने माझ्या तक्रारी थेट उद्धव ठाकरेकडे केल्या असल्याचे सांगितले.नंतर मला मातोश्री वरून राउतांचा फोन आला.नंतर मी त्यांच्यासमवेत काय बोलायचे ते संभाषण केले. आणि ढाकणेंचा समाचार घेण्यासाठी आज पाथर्डीत मुद्दाम हुन प्रचाराच्या सांगता सभेला आलोय असे सचिन घायाळ यांनी सांगितले.आणि प्रतापराव ढाकणे यांच्याविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन करीत टीका केली.ही टीका केल्यानंतर काकांचे कार्यकर्ते नेमके काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.एकंदरीत शेवगाव पाथर्डी विधान सभा मतदारसंघातील राजकीय वातावरण उमेदवारांच्या एकमेकांवरील चिखलफेकी मुळे चांगलेच दुषित झाले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापराव ढाकणे यांनीही आपणच ही निवडणूक जिंकणार आहोत असे सांगून शह काटशह देऊन विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नेमके कोण जिंकणार या साठी घोडामैदान जवळ आले आहे.