पाचोरा-भडगावात परिवर्तनाचा झंझावात : वैशालीताई सुर्यवंशींना प्रतिसाद

पाचोरा-भडगावात परिवर्तनाचा झंझावात : वैशालीताई सुर्यवंशींना प्रतिसाद

 

 

 

पाचोरा/भडगाव (प्रतिनिधी ) : पाचोरा आणि भडगाव शहरांसह दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या झंझावातील प्रचार फेऱ्यांना प्रतिसाद देत नागरिकांना परिवर्तनाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असतांना शिवसेना-उबाठाच्या तिकिटावर मशाल चिन्हावरून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी निर्णायक आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. पहिल्यापासून त्यांच्या प्रचार फेऱ्यांना अतिशय स्वयंस्फुर्त असा प्रतिसाद लाभत आहे. यातच आता अंतीम टप्प्यात त्या ग्रामीण भागात फिरत आहेत. त्यांनी आज भडगाव तालुक्यातील शिंदी व कोळगाव तर पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे प्रचार फेरी काढली. यात प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत करून यंदाच्या निवडणुकीत नक्कीच परिवर्तन घडून ताईंचा विजय होणार असल्याचे आवर्जून नमूद केले. वैशालीताईंनी आपण निवडून आल्यानंतर समग्र विकास करणार असल्याचे सांगितले.

वैशालीताई सुर्यवंशी यांनी पाचोरा विधानसभा मतदारसंघाचा समग्र विकास करणार असल्याचे अभिवचन मतदारांना दिले आहे. यासोबत भय व दडपशाहीमुक्त वातावरण निर्मितीसह शेती व सिंचनाला प्राधान्य देत सर्वसामान्यांना विकासाच्या सर्व संधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. यासोबत त्यांनी मतदारसंघातील अवैध धंद्यांना आलेले उधाण, भ्रष्टाचार, दडपशाही यांच्या विरोधात देखील त्यांनी नारा बुलंद करत जनतेला कौल मागितला आहे. त्यांच्या या आवाहनाला तालुक्यातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या प्रचार फेऱ्यांना मिळणारा प्रतिसाद हा विरोधकांना धडकी भरवणारा असून यामुळे मतदारसंघात सध्या त्यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

आजच्या प्रचार फेरीत डॉ. उत्तमराव महाजन, डॉ. संजीव पाटील, दिपक पाटील, पप्पू पाटील, प्रदीप पाटील, शाम सर, गोरख पाटील, योजना पाटील, रतन परदेशी, मुकेश पाटील, अजय पाटील, योगेश पाटील, राजेंद्र शिंपी, प्रवीण पाटील, महादू पाटील, अरूण पाटील, संदीप पाटील, प्रभाकर पाटील, विजय पाटील, विजय साळुंखे, दत्तू मांडोळे, प्रदीप पाटील, राजेंद्र पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचार फेरीत सहभागी झाले होते.