के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत पॉलीटेकनिक मेकॅनिकल विभागातर्फे व्याख्यानाचे
के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत पॉलीटेकनिक मेकॅनिकल विभागातर्फे व्याख्यानाचे आयोजन : के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत पॉलीटेकनिक मेकॅनिकल विभागातर्फे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . महाविद्यालयचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी व डिप्लोमा समन्व्यक डॉ सी एस पाटील यांच्या व्याख्यानाने सुरुवात झाली . मेकॅनिकल विभागाच्या प्रमुख प्रा पूजा आडवाने व इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर विभागाच्या प्रमुख प्रा ए एन शेवाळे यांनी उपस्थितांना संबोधित केले . तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा आनंद बंग (सॉफ्ट टच कॉम्पुटर व सी इ ओ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर , शासकीय तंत्रनिकेतन जळगाव ) उपस्थित होते . सत्राची सुरुवात प्रा कामिनी पवार यांनी केली . प्रा आनंद बंग यांनी मेकॅनिकल डिझाईन सॉफ्टवेअर चा वापर कसा करावा या बद्दल सादरीकरण करून अटोकॅड ,प्रो -इ ,कॅसिया अश्या विविधसॉफ्टवेअर ची माहिती दिली . इंडस्ट्री मध्ये मेकॅनिकल क्षेत्रात होणारा ए आय टूल चा वापर व कॅड कॅम बद्दल तसेच ऑटोमेशन टेकनॉलॉजि यावर मार्गदर्शन केले . प्रा शरयू भुते यांनी आभार प्रदर्शन केले .कार्यक्रमाचे आयोजन प्रा पी आर पाटील यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी , प्राध्यापक , यांनी मेहनत घेतली .