सुसंस्कारित प्राजक्त तनपुरेंना तुमचा आधार द्या आणि प्रचंड मतांनी विजयी करा : शरद पवार
(सुनिल नजन “चिफ ब्युरो”अहिल्यानगर) अहमदनगर जिल्ह्यातील 223 राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा मतदारसंघातील सुसंस्कारित प्राजक्त तनपुरेंना तुमचा आधार द्या आणि प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन भारत देशाचे माजी केंद्रीय क्रुषीमंञी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केले.ते राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत बोलत होते. पवार साहेब यांनी महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकार वर जोरदार टीका करीत देशाची घटना बदल, बेरोजगारी,शेतकरी आत्महत्या,अत्याचार ग्रस्त बालिका,या सर्व गोष्टींवर प्रकाश झोत टाकून लाडक्या बहिणीचे शोषण करायचे का भक्षण, या गोष्टींवर प्रकाश टाकला.एका कार्यकर्त्यांने भाजपचे विरोधी उमेदवार यांनी त्यांची सख्खी पुतणी डॉ.शुभांगी शंकर शेडाळे,/ कर्डिले यांनी पञकार परिषद घेऊन आपल्यावर भाजपच्या विरोधी उमेदवारांकडून कसा अन्याय होत आहेत याची क्लिप दाखवली. त्याचा आधार घेऊन पवार साहेब म्हणाले की लाडक्या बहिणी बाबद आमची तक्रार नाही.पण समोरच्या उमेदवाराचे नाव न घेता त्यांच्याकडून शोषण करायचे का भक्षण असा सवाल उपस्थित केला.तसेच प्राजक्त तनपुरे सारखा चांगले सुसंस्कारित काम करणारा आमदार निवडून दिला पाहिजे. त्यांना
पाच वर्षे कामाचा अनुभव आहे.आता राष्ट्रवादीचा आमदार निवडून देण्याची तुमची जबाबदारी आहे असे आवाहन पवार साहेब यांनी केले. या जाहीर सभेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा योगिताताई राजळे,गोविंद मोकाटे,दादा कळमकर, अशोक बाबर,सक्षणा सलगर, बाबासाहेब भिटे,प्रसादराव तनपुरे,डॉक्टर उषाताई तनपुरे,आमदार सौभाग्यवती सोनालीताई तनपुरे,यांच्यासह मतदारसंघातील अनेक गावातील कार्यकर्त्यां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.राहुरी मतदारसंघात आता दोन्ही गटाकडून खरा प्रचार सुरू झाला आहे. विरोधी उमेदवारानी ही भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील प्रचार प्रमुख रावसाहेब दानवे,आमदार पंकजाताई मुंडे यांच्यासभा घेऊन मतदार संघातील वातावरण ढवळून काढले आहे.